आर्थिक उत्पन्नात वृध्दी होईल

त्रैमासिक भविष्य - कर्क
आर्थिक उत्पन्नात वृध्दी होईल

नोव्हेंबर - 2021

ग्रहस्थिती- आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी रवी, मंगळ, बुध, पंचमात केतू, षष्ठात शुक्र, सप्तमात गुरु, शनि- प्लुटो, अष्टमात नेपच्यून, दशमात हर्षल लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास- तुमच्या राशीची आद्याक्षरे- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, ए अशी आहेत. तुमच्या (कर्क) राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी, चंद्र, तत्व- जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, उत्तर दिशा तुमच्यासाठी फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण- ब्राम्हण, स्वभाव- सौम्य, कफ, प्रकृती राशीचा अंमल छातीवर आहे. शुभरत्न- मोती, शुभ रंग- पांढरा किंवा क्रीम कलर, शुभ दिवस- सोमवार तुमच्यासाठी शंकराची उपासना फायद्याची आहे.

शुभ अंक- 2, शुभ तारखा- 2, 11, 20, 29.

मित्र राशी - वृश्चिक, मीन, तुला, शत्रू राशी- मेष, सिंह, धनू, मिथुन, मकर व कुंभ, अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक, कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रवीण, प्रामाणिक, भावूक, विचारी, परोपकारी ईश्वरभक्तीमध्ये रस.

चतुर्थातील रवी राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीवाडीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना विशेषतः चांगला राहील. शारीरिक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील.

स्त्रियांसाठी- महिलांचा धार्मिकतेकडे कल राहील. बोलताना कडू शब्द वापरण्याचे टाळल्यास घरात तणावरहीत वातावरण राहील. अपघातातून आश्चर्यकारकरित्या सुटका होईल. पतीराज तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहिण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा- 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30.

डिसेंबर - 2021

ग्रहस्थिती- महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात रवी-बुध-केतू, षष्ठात शुक्र, सप्तमात शनी-प्लुटो, अष्टमात-गुरू नेपच्यून, दशमात- हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिकच त्याचा परिणाम मातृसुखात येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. राहत्या घरी आग किंवा चोरीची भीती आहे. सावध राहणे चांगले, इस्टेटीचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. वृद्धांनी घरच्या मंडळींशी जमवून घ्यावे. अन्यथा उगीचच मनःस्ताप सहन करावा लागेल. नोकरी, उद्योग-व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. विशेषतः कापूस, चांदी, हिरे यांचा व्यापार्‍यांसाठी फार चांगला महिना आहे. स्त्री वर्गाशी चांगले पटेल. वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. बंधू सुख उत्तम मिळेल.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. स्त्री-पुत्र सुख उत्तम मिळेल.

उपासनेमध्ये मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे जमेल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळू शकेल. एखादे प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल.

स्त्रियांसाठी- महिलांना व्यक्तिमत्व सौंदर्यात वृद्धी करण्यासाठी ब्युटी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुश राहिल्यामुळे एखाद्या अलंकाराची खरेदी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरं म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा- 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28.

जानेवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी मंगळ- केतू, षष्ठात रवि-शुक्र, सप्तमात बुध-शनि-प्लुटो, अष्टमात गुरू- नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात गुरू आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा इतर आजार संभवतात. मात्र गंभीर धोका नाही. रामदेवबाबा प्रणित योग साधनेला हा गुरू फार चांगला आहे. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृतधन प्राप्तीचाही योग आहे, परंतु त्याच्या पाठीमागे लागू नये. अन्यथा असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. खालच्या वर्गातील दुःखी व उदासी लोकांचा सहवास मिळेल. त्याचा स्वतःच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नये. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

षष्ठस्थानी शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार-विहारामध्ये फार जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक केल्यास स्वास्थ्य बिघडेल. एकांतवास प्रिय वाटणार नाही.

श्रृंगारप्रियतेकडे कल राहील. स्त्रीविषयक प्रेम शारीरिक सुखापुरते मर्यादित राहील. कौटुंबिक सुखाच्यादृष्टीने हे बरे नाही. लाभात असलेला राहू अभिमानाची मात्रा वाढवील. अहंकाराची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. स्त्री वर्गाशी चांगले पटेल.

स्त्रियांसाठी- षष्ठातील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरुणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. आठव्या गुरुमुळे विवाह जुळण्यात अडचणी संभवतात. स्त्रियांच्या सहनशीलतेत वाढ होईल.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांची शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. तुमच्या अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील.

शुभ तारखा- 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com