धनप्राप्तीचा वेग वाढेल

त्रैमासिक भविष्य - कर्क
धनप्राप्तीचा वेग वाढेल

सप्टेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि- बुध, द्वितीयात मंगळ -शुक्र , पंचमात केतू, सप्तमात शनि- केतू, अष्टमात गुरू-नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे ही,हू,हे,हो,डा,डी,डू,डे, डो अशी आहेत. कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी -चंद्र, तत्त्व-जलचर असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची. सत्व गुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती. राशीचा अंमल छातीवर आहे.

शुभ रत्न-मोती, शुभ रंग- सफेद, शुभ दिवस- सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक- 2, शुभ तारखा- 1,11,20, 29.मित्र राशी- वृश्चिक, मीन, तुला. शत्रुराशी- मेष, सिंह, धनू, मिथून, कर्क. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान. कुशल प्रबंधक. कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रविण. परोपकारी. ईश्वरभक्तीत रस.

लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. कामाच्या गर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. आहार कमी होईल. स्वभाव उदार राहील. पित्ताचा त्रास होईल. वेळीच काळजी घ्या. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल. शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 1, 3, 7, 8 9 10, 13, 14, 15, 16, 19, 21, , 23, 29, 30

ऑक्टोबर- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी रवि-मंगळ-बुध, पंचमात शुक्र-केतू, षष्ठात प्लूटो, सप्तमात शुक्र-शनी, अष्टमात -नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. लढाऊ वृत्ती चांगली असल्याने शत्रूंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग आहे. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील.

तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. मोठ मोठ्या व्यापार्‍यांशी ओळखी होतील. आर्थिक आवक वाढेल. गूढविद्येविषयी आकर्षण वाढेल. भावी घटनांची स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होतील.

तृतीयातील बुधामुळे साहसाकडे कल राहील. विद्याव्यासंगात भर पडेल. लोकहिताची कामे कराल. कला व व्यापार यांच्या संगमातून धनप्राप्तीचा वेग वाढेल.

पंचमात शुक्र आहे. सरकारी दरबारी वजन वाढेल. कन्याचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन भेटतील. शत्रुंवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रेचे योग.

स्त्रियांसाठी - नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. गायनवादनादी कलात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29, 30

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थात बुध-रवि-मंगळ, पंचमात केतू, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु-शनी-प्लूटो, अष्टमात नेपच्यून, दशमात हर्षल लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण-तरूणींना चांगला जोडीदार मिळेल. थोरांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास कराल. लबाडांनाही वश कराल. कोर्ट कचेर्‍यांच्या कामात यश मिळेल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त करण्याचे योग आहेत. स्वतःच्या सामर्थ्यांबद्दल गर्व वाटेल. विद्वान लोकात मान मिळेल.

लाभात राहू आहे. अभिमानाची मात्रा वाढवील. अहंकाराची बाधा होऊ नये ही काळजी घ्या. पंचमात केतू आहे. या ठिकाणचा केतू तुम्हाला धर्माचरणाची ओढ लावेल. उपासनेत चांगले यश मिळेल. याठिकाणचा केतू असता मुलांच्या प्रकृतीविषयी तक्रारी निर्माण होतात. मोठ्या मुलाची वागणूक विरोधात असेल. पत्नीचा चेहरा उतरलेला असेल. संसारसुखात अडचणी येतात.

स्त्रियांसाठी - महीलांना पतीराजांचे उत्तम सहाकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येत नाही.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com