Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कर्क Quarterly Future - Cancer

त्रैमासिक भविष्य – कर्क Quarterly Future – Cancer

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी मंगळ, पंचमात केतू, सप्तमात शनी-प्लुटो, दशमात-हर्षल, लाभात रवि-बुध-राहू, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीचे अध्याक्षरे ही, हू, हे, हो, डा,डी, डू अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्त्व जल आहे. चर राशी असल्याने चंचल स्वभाव, वर्ण- ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती. राशीचा अंमल छातीवर आहे

शुभ रत्न- मोती, शुभ रंग-पांढरा, शुभ वार- सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक – 2, शुभ तारखा-2,11,20,29. मित्र राशी- मीन, वृश्चिक, तुला. शत्रु राशी-मेष, सिंह, धनु, मिथून. अध्ययनाची आवड, जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक, योजना तयार करण्यात प्रविण. प्रामाणिक, भावुक, ईश्वरभक्तीत रस.

एकादशात रवि आहे. यामुळे आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या श्रमाचा मोबदला आता मिळू लागेल. पराक्रमाला जोर येईल. संयमशील असल्याने चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व कुलीन मिळतील. हाताखालच्या लोकांकडून कसून काम करून घ्याल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा -2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-शुक्र, पंचमात केतू, सप्तमात शनी-प्लुटो, अष्टमात गुरू-नेपच्यून, दशमात हर्षल, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. शत्रुंना गोड बोलून वश कराल. इष्ट हेतू सिद्धीस जातील. सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीसाठी एकादशातील बुध चांगला समजला जातो. त्यातून अध्यात्मिक उन्नती साधाल. शिक्षक, प्राध्यापकांचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास प्रगती होईल.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लगेच आत्मसात करून त्यापासून धनसंपत्ती मिळवाल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

रवि- गुरू नवपंचम योग आहे. या शुभयोगामुळे प्रकृती स्थिर राहील. श्रीमंत व थोर व्यक्तींशी ओळख होईल. नितीमत्तेंची वृद्धी होईल. ध्येयावर दृष्टी ठेवून मार्गक्रमण कराल.

स्त्रियांसाठी -लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

ऑगस्ट – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-रवि, द्वितीयात मंगळ-शुक्र, सप्तमात शनि-प्लूटो, अष्टमात गुरू-नेपच्यून, दशमात हर्शल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात गुरु आहे. स्वास्थ उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा अन्य आजार उद्भवतात. मात्र गंभीर धोका नाही. योग साधनेला हा गुरू फार चांगला आहे. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृत धनप्राप्तीचाही योग संभवतो. परंतू त्यापाठी लागू नये. अन्यथा असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

पंचमात केतू आहे. हा केतू धर्माचरणाची ओढ लावील. उपासनेत चांगले यश मिळेल. या केतूमुळे संसारसुखात अडचणी येतील. मुलांच्या प्रकृतीविषयी तक्रारी निर्माण होतील. मुली मात्र दिर्घायुषी असतील. मोठ्या मुलांची वागणूक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा नेहमी उतरलेला असतो. कन्या संततीचे प्रमाण अधिक असते. याठिकाणी केतू मांत्रिक विद्येची आवड निर्माण करतो. हलक्या लोकांची संगत धरू नका.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या