त्रैमासिक भविष्य - मेष Quarterly Future - Aries

वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्य
त्रैमासिक भविष्य - मेष Quarterly Future - Aries

सौ. वंदना अनिल दिवाणे

मे - 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-हर्षल, द्वितीयात बुध-राहू-शुक्र, तृतीयात मंगळ, अष्टमात केतू, दशमात शनी-प्लुटो, लाभात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीची आद्याक्षरे चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी मंगळ, तत्त्व- अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल. पूर्व दिशा फायद्याची. लिंग- पुरूष, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याला इजा होणार नाही ही काळजी घ्या. शुभ रंग-लाल, शुभ रत्न- पोवळे, शुभ दिवस-मंगळवार, रविवार, देवता- शिव, भैरव, मारूती. शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9,18,27. मित्र राशी-सिंह, तुला, धनु. शत्रु राशी- मिथुन, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी, कुटुंबाचे उत्तम पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर चढेल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली असल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग राहील. भावंडांसाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्य कविता सुचतील. दैवी कृपेची प्रचिती येईल.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी तुमचा हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल. विद्यार्थ्यांसाठी -मे महिना सुट्टीचा महिना आहे. विद्यार्थी शांत बसणार नाही. अभ्यासाचे दडपण दूर राहील. मनाप्रमाणे खेळात फिरण्यात, व्यायामात भाग घेऊ शकतील.

शुभ तारखा -1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 3

जून - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशस्थानी हर्षल, द्वितीयात रवि-बुध-राहू . तृतीयात शुक्र, चतुर्थात मंगळ, अष्टमात केतू, दशमात शनी-प्लुटो, लाभात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयात रविमुळे वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. तुमच्या खर्चिक व उदार स्वभावावर अंकुश लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. पूर्वाध चांगला आहे. कर्जापासून दूर रहा. कर्ज घेतलेले असल्यास हप्ते वेळेवर भरा. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटूंबासाठी बरीच दगदग होण्याची शक्यता आहे.

तृतीयात शुक्र आहे. कृपणवृत्ती राहील. पराक्रमाला जोर येईल. आळसाचे आकर्षण वाटेल. बंधूप्रियता राहील. डोळ्याच्या विकारांची शक्यता आहे. कवी वर्गास उत्तम कविता सुचतील. स्वभाव काहीसा आनंदी व उल्हासी राहील. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील.

दशमात शनि आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील. आपल्या बुद्धीमत्तेने लोकांना चकीत कराल. त्यामुळे तुमच्याविषयी आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल. सत्तापक्षातील प्रतिनिधींना मंत्रीपदाची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्षल, द्वितीयात बुध-राहू, तृतीयात रवि, चतुर्थात मंगळ-शुक्र, अष्टमात केतू , दशमात शनी-प्लूटो, लाभात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

राशीच्या तनुस्थानी हर्षल असल्याने धाडसाकडे कल राहील.स्वभाव कमालीचा लहरी चंचल आणि इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. राजकारणात असाल तर भाषणातून श्रोत्यावर आश्वासनांचा पाऊस पाडाल. मात्र अनुयायी, श्रोते यावर विश्वास ठेवतील असे नाही. स्वतःला कितीही फिलगुड वाटले तरी इतरांना वाटेलच असे नाही. लोकाचार व रूढी यांच्याविरुद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत तर क्षणात बडाबडा राहील.

लाभात गुरू आहे. हा गुरू तुमच्यासाठी लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा तुमच्यामुळे चांगला फायदा होईल.

वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचार असल्यास तो आताच अंमलात आणा. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबर भाग्योदयास प्रारंभ होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला असेल. पुढे घडणार्‍या घटनांचा अंदाज येईल.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com