Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधसांपत्तिक लाभ होतील

सांपत्तिक लाभ होतील

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-नेपच्यून , तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू , दशमात मंगळ -केतू, लाभात रवि-शुक्र, व्ययात बुध-शनी-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू,गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असे आहे. राशी स्वामी शनि, तत्त्व- वायु, राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढ्या लवकर वर चढतो तेवढ्या लवकर उतरतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, तमोगुणी, काहीसा क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे. शुभ रत्न- निलम, शुभ रंग- आकाशी,निळा, काळा. देवता-शनि व हनुमान. शुभ अंक- 8, शुभ तारखा- 8/17/26.

तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्‍यांना याची प्रचिती येईल. कामाच्या गर्दीमध्ये भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. स्वभाव उदार राहील. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी – हातात पैसा खेळता राहील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजार पाजारच्या सखी तुमचा हेवा करतील. सुशिक्षित महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

फेब्रुवारी – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू- नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू, दशमात केतू, लाभात मंगळ-शुक्र. व्ययात रवि- बुध-शनि- प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. त्यापैकी काही मतलबी, लबाड, ढोंगी असण्याची शक्यता आहे. वाईट संगत ठेवल्यास वारंवार भांडणाचे प्रसंग येतील.

लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. संसारात चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. प्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. वाढत्या वयामुळे शरीर स्थूल होण्याची भिती त्यामुळे चालण्याचा व्यायाम करावा. उच्चपदप्राप्ती होईल. हाताखालील लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. सरळ स्वभाव राहील. विद्याव्यासंगात भर पडेल. न्यायी व समतोल स्वभावामुळे लोेकप्रियता वाढेल.

तृतीयातील हर्षल लेखक वर्गासाठी चांगला आहे. लेखनात सूर लागेल. नालौकीक व प्रसिद्धी वाढेल. विचित्र स्वभावाच्या लोकांपासून दूर रहावे. नाही तर नुकसान होईल.

स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

मार्च – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-गुरू-नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू दशमात केतू , व्ययात मंगळ-शुक्र-शनी-बुध-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययातील शनी धार्मिक बाबतीत तुमची स्वतंत्र अशी मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाला सोडून उत्साहाने कामाला लागा. यश तुम्हाला शोधत येईल. शनिला मेहनत करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब करतो पण हात आखडता घेत नाही.

दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍यानां नोकरीचे योग आहे. वाहनांपासून सावधान रहा. बुद्धी तीक्ष्ण राहील. कारागिरी आवश्यक असलेेले काम चांगले जमेल. नीचांची संगत टाळा अन्यथा नसत्या भानगडीत अडकाल. प्रवास घडेल. त्यातून आर्थिक प्राप्तीची शक्यता.

द्वादशातील शुक्र वैयक्तिक जीवन सुखी ठेवेल. मात्र कुटुंबासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होणार नाही.

व्ययातील प्लुटोने खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढविले आहे. अध्यात्मात प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल. स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 3, 4, 5, 7, 12, 13, 15, 16, 19, 20, 25, 26, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या