Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधहिशेबीपणामुळे धनसंग्रह जमेल

हिशेबीपणामुळे धनसंग्रह जमेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-गुरू-शुक्र-नेपच्यून, द्वितीयात रवि-बुध, तृतीयात राहू-हर्षल,नवमात केतू व्ययात शनी-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष आहे. राशी स्वामी शनी, तत्त्व – वायू, राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढ्या लवकर वर जातो तितक्या वेगाने खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष आहे. तमोगुणी स्वभाव, काहीसा क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यावर आहे. पायाला इजा होऊ नये याची काळजी घ्या.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार तुमच्यापुढे उघडी करेल. अन्य जणांचे लक्षही जाणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्यास ललीतकला, कथालेखन, वक्तृत्त्व यापासून द्रव्यलाभ होईल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 6, 7, 8, 10, 11, 13, 14, 15, 17, 21, 24, 26

मे – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी मंगळ-शनि, द्वितीयात गुरू-शुक्र-नेपच्यून, तृतीयात राहू-रवि-हर्षल, चतुर्थात-बुध, नवमात केतू, व्ययात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या हा यशाचा बायप्रॉडक्ट आहे. ते सर्व नष्ट होतील. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमाने नाश होतील. शास्त्र संशोधनात तत्संबंधीत लोकांना यश मिळेल. सौख्य व विलास उपभोगायला मिळेल. मोठ्या उलाढालीमुळे व्यापार्‍यांच्या नफयात वाढ होईल. नोकरवर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. शेतकर्‍यांना पशुधनापासून लाभ होतील.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगात सारखे काम करत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. बदल करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा वेळ व पैसा वाया जातो शेवटी हातात काहीच येत नाही. नातेवाईकांशी पटणार नाही. पिताश्रींकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. अर्थिक सहकार्याची शक्यता कमी आहे. मातृसुखात काही ना काही अडचणी येतील. मात्र निराश होण्याचे काही कारण नाही.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – मे महिना सुट्टीचा महीना त्यात पंचमेश बुध शांत बसू देणार नाही. विद्यार्थी मनाप्रमाणे वाचनात, खेळात, व्यायामात भाग घेऊ शकतील. अभ्यासाच दडपण दूर होईल.

शुभ तारखा – 1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि, द्वितीयात गुरू-मंगळ-नेपच्यून, तृतीयात शुक्र-राहू-हर्षल, चतुर्थात रवि- बुध, नवमात केतू, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात शुक्र आहे. कृपण वृत्ती राहील. पराक्रमास जोर येईल. आळसाचे आकर्षण वाटेल. बंधूप्रियता वाढेल. डोळ्यांच्या विकारांची शक्यता आहे. स्वभाव आनंदी राहील. विवाहोत्सुकांचे विवाह पटकन जुळतील. काम नीटनेटकेपणाने पार पाडाल.

लग्नी शनी आहे. तीक्ष्ण बुद्धीमत्तेमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वाढ होईल. हिशेबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेलच शिवाय नियमीत बचत करणे सोपे जाईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह धरू नये.

तृतीयात हर्षल आहे. लेखक वर्गासाठी चांगला आहे. प्रसिद्धी मिळेल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विचित्र स्वभावाच्या लोेकांपासून दूर रहा अन्यथा नुकसान होईल. अध्यात्मात प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहि

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या