Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - वृश्चिक - वैभव प्राप्त होईल

त्रैमासिक भविष्य – वृश्चिक – वैभव प्राप्त होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

मार्च – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयात प्लूटो, चतुर्थात रवि-बुध-शनि, पंचमात शुक्र-गुरू-नेपच्यून, षष्टात राहू-हर्षल, सप्तमात मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना,नी,नू,नो,या,यी, यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ आहे. उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. स्वभाव सौम्य. वर्ण ब्राह्मण. कफ प्रवृत्ती. पाठविकाराबाबत काळजी घ्यावी. शुभ रत्न- पोवळे, शुभ रंग- लाल, शुभ वार-मंगळवार, देवता- शिव,हनुमान, भैरव. शुभ अंक-9, शुभ तारखा- 9/18/27. मित्रराशी- कर्क, मीन. शत्रुराशी- मेष, सिंंह, धनु. सूड घेण्याची वृत्ती. क्षमा करणार नाही. प्रिय व्यक्ती च्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधे, डॉक्टरसाठी चांगली रास. दृढप्रतिज्ञ, साहसी व कर्मठ, स्पष्टमतवादी.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात काम करण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, प्रयत्न, वेळ वाया जातो. आणि पदरात शेवटी काहीच पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. पिताश्रींपासून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता नाही.

स्त्रियांसाठी – चतुर्थातील शनि महिलांसाठी चांगला नाही. स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नात वाढ करावी. वाढत्या महागाईमुळे खर्चाचे बजेट सांभाळणे कठीण जाईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमेश गुरू आहे. विद्यार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील. मात्र आळस झाडून नियमीतपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ‘ हे वचन लक्षात

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरूवातीला तृतीयस्थानी प्लुटो, चतुर्थात शनि, पंचमात रवि-बुध-गुरू-नेपच्यून, षष्ठात शुक्र-राहू – हर्षल, अष्टमात मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावे वाटेल. विद्याभ्यासात चंचल बुद्धीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवला पाहिजे. अशी ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार, बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशाप्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसाही मिळेल. पण असे व्यवहार जपून करावे. विनाकारण विषाची परीक्षा घेणे धोक्याचे ठरेल.

पंचमस्थानतील गुरू हा स्वतंत्र भाग्येश आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सर्वत्र पसरेल. सत्पुत्र सुख प्राप्त होईल. वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संतती सुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास उत्तम लिखाण होईल. लोक शिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल. मोठ मोठ्या समारंभात सहभागी व्हाल. सट्ट्यासारख्या व्यवहारात व व्यापारात सहभागी व्हावे वाटेल.

षष्ठस्थानी राहू आहे. शत्रूंचा समाचार घेण्याची वेळ आता आली आहे. धाडसाने दोन हात केल्याास त्यांचा पराभव निश्चीत आहे.

स्त्रियांसाठी – षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. पंचमातील गुरूची चांगली साथ मिळेल. स्त्रियांची सहनशीलता त्यातून निभावून नेईल.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमातील नेपच्यून विद्यार्थ्यांना अंतःस्फूर्ती प्रदान करील. पाठांतरासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. सतत वाचन केल्यास कोणताही विषय अवघड जाणार नाही.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थात शनी, पंचमात – नेपच्यून,षष्ठस्थानी रवि-बुध-गुरु-राहू-हर्शल, अष्टमात मंगळ-शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टावर आधारित असावी कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गांचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरुवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर असतो.

रवि – मंगळ जिरेकादश योग आहे. या शुभयोगामुळे धाडसी वृत्ती राहील. उदारवृत्ती राहील. अधिकारी व मोठमोठ्या लोकांशी संबंध राहतील. अधिकार प्राप्त होतील. पोलीस, लष्कर इ. लोकांना याची विशेष प्रचिती येईल. सरकारी कामात यश दर्शवितो.

रवि-शुक्र जिरेकादश या शुभ योगामुळे सरकारी, निमसरकारी, सहकारी संस्थातून नोकरी करणारांना अतिशय उन्नतीकारक असा महिना आहे. विशेषतः महिन्याच्या पूर्वार्धात याची प्रचिती येईल.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी- पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने व आशीर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल. व टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22

- Advertisment -

ताज्या बातम्या