Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधधनसंग्रह करणे जमेल

धनसंग्रह करणे जमेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

मार्च – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी प्लूटो, तृतीयात रवि-बुध-शनि, चतुर्थात शुक्र-गुरू-नेपच्यून, पंचमात राहू-हर्षल, षष्टात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीचे चिन्ह चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूषाचा असा हा पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला असा आहे. राशी स्वामी – गुरु, तत्व – अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रीयांची वागणूक पुरूषी थाटाची असते. वर्ण क्षत्रिय, स्वभाव- क्रूर, पित्त प्रकृती. राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न -पुष्कराज. शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस-गुरुवार, देवता-विष्णु, शुभ अंक-3, शुभ तारखा- 3/12/21/30. मित्रराशी- मेष, सिंह. शत्रुराशी- कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली. स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण, मुडी स्वभाव.

षष्ठातील मंगळात शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कुटुंबात निष्कपटपणे वागल्यामुळे घरात कौटुंबिक कलह होणार नाहीत. पंडित जनांशी मैत्री होईल. वेळोवेळी त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरूवातीला धनस्थानी प्लुटो, तृतीयात शनि, चतुर्थात रवि-बुध-गुरू-नेपच्यून, पंचमात शुक्र-राहू – हर्षल, षष्ठात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थसथानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना यावा विशेष अनुभव येईल. जमीन जुमला व सांपत्तिक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. भपक्याची हौस वाटेल. पोकळ डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकांत हसे होण्याची शक्यता आहे. अशा लोकांना परदेशगमन करून भाग्य आजमावे.

पंचमात शुक्र आहे. सरकारी दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाढेल. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचा योग आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशमगन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी प्लूटो, तृतीयात शनी, चतुर्थात – नेपच्यून,षष्ठस्थानी रवि-बुध-गुरु-राहू-हर्शल, सप्तमात मंगळ-शुक्र, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. उपासनेत मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात यश मिळेल. वृद्धी होईल. धनसंग्रह करणे जमेल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळू शकेल. प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल. बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.

एकादशस्थानी केतू आहे. पराक्रमांकडे कल राहील. समाधानी वृत्ती राहील. सत्कर्मे कराल. मान्यता प्राप्त होईल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.

पंचमात हर्षल आहे. सट्टे, लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा. संततीविषयक त्रास संभवतो. भावनेच्या भरात प्रेमप्रकरणात चूक होण्याचा संभव आहे. विवेकाची कास धरावी.

स्त्रियांसाठी -व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी- पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने व आशीर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल. व टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या