स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील

त्रैमासिक भविष्य - धनु
स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-शुक्र, द्वितीयात शनी-प्लूटो, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात गुरू, पंचमात राहू-हर्षल. षष्ठात मंगळ, लाभात केतू , व्ययात रवि अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा असा पुरुष मुखरहित घोड्यावर बसलेंला आहे. राशीस्वामी- गुरू, तत्व-अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूवृ दिशा फायद्याची. लिंग पुरूष असल्यामुळे काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे आहे. वर्ण- क्षत्रिय, स्वभाव- क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न-पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस - गुरूवार, देवता- विष्णु, शुभ अंक- 3, शुभ तारखा-3/12/21/30. मित्रराशी-मेष, सिंह, शत्रु राशी- कर्क, वृश्चिक, मीन.गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली, स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण, मुडी स्वभाव.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावाची त्यात भर पडेल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल फार प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोेणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यस्त रहाणे आवडेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या द़ृष्टीने चांगला काळ. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. यांकडे दुर्लक्ष करा.

शुभ तारखा - 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी - 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि-बुध, द्वितीयात शुक्र- शनि-प्लूटो, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात गुरू, पंचमात राहू-हर्शल, षष्ठात- मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

शनी धनस्थानी असल्याने आर्थिक आवक वाढवून काटकसरीचे धडे शिकवील. आर्थिक व्यवहार जपून करावे. भागीदारीच्या व्यवहारात सतर्क रहावे. किंवा शक्य असेल तर टाळावे.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. घरात कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडीत जनांशी मैत्री होईल. वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. व आर्थिक लाभही होतील. विद्याव्यसंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा राहील.

लाभस्थानी केतू आहे. पराक्रमाकडे कल राहील. बहुजन समाजाविषयी प्रेम राहील. समाधानी वृत्ती राहील. सत्कर्मे कराल. मान्यताप्राप्त होईल. सत्कर्माची फळे लवकर मिळतील. हाती घेतलेल काम पूर्ण कराल.

स्त्रियांसाठी -द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारी पाजारी हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 24, 26, 27

फेब्रुवारी - 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, द्वितीयात रवि-प्लूटो, तृतीयात नेपच्यून-शुक्र-शनी, चतुर्थात गुरू, पंचमात राहू-हर्षल, षष्ठात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थस्थानीतील गुरुमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकिकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा अनुभव येईल. जमीन जुमला व सांपत्तीक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज आवश्यकता नाही. पोकळ डौल मिरवण्याची हौस निर्माण होईल. परदेशगमन करून भाग्य आजमावे.

पंचमात हर्षल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा कारण त्यात यश मिळणार नाही. संततीविषयक त्रास संभवतो. कायद्याला व शिष्टाचाराला धरून वर्तन ठेवावे. संततीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

द्वितीयातील रवीमुळे वडील मंडळींकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे.

स्त्रियांसाठी -तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगले राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललित कलांमध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी- विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com