Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधधनसंग्रह करणे शक्य होईल

धनसंग्रह करणे शक्य होईल

ऑक्टोबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरु, द्वितीयात राहू-हर्षल, तृतीयात मंगळ, षष्ठात रवि-बुध-शुक्र, अष्टमात केतू, लाभात शनी-प्लूटो, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थितीे आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे दी,दू, झा, ज्ञा, था, दे,दो, चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरुद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी असे आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व-जल, राशी द्विस्वभाव असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री, सत्वगुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल पावलावर आहे. पायाच्या दुखापतीविषयी सावध रहा. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता- विष्णु, मित्र राशी- कर्क, वृश्चिक, शत्रु राशी- मेष, सिह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, परिश्रमी, स्वप्रयत्नानक प्रगती होईल.

द्वितीयातील हर्षल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास त्रास होणार नाही. मोठ्या मोठया योजना आखण्याचे काम तूर्त स्थगित ठेवावे. वाहनासंबंधी संस्थातून नोकरी मिळण्यास हा काळ चांगला आहे. आंथरून पाहून पाय पसरावेत. अन्यथा मोठ्या योजना अर्ध्यातच राहील.

स्त्रियांसाठी –षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. लग्नी गुरूची चांगली साथ राहील. स्त्रियांची सहनशीलता त्यातून सहज निभावून नेईल.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी – गुरू, द्वितीयात-राहू-हर्षल, चतुर्थात मंगळ, अष्टमात रवि-बुध-शुक्र, लाभात शनि-प्लूटो, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययात नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना यश मिळेल. सामाजिक मान्यता मात्र त्या प्रमाणात मिळणार नाही. हॉस्पिटल व तुरुंगाशी संबंधित कामापासून लाभ होतील. लोकोपयोगी काम करण्यात आनंद मिळेल.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनापासून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात आग किंवा चोरीची शक्यता आहे. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकलावे. वृद्धांनी घरातील मंडळींशी जमवून घ्यावे अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल.नोकरी, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. वाहन खरेदीसाठी चांगला काळ. अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यासाठी समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रु त्यांच्या दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील.

स्त्रियांसाठी –अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहि

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी-गुरू, द्वितीयात राहू-हर्शल, तृतीयात मंगळ, अष्टमात केतू, नवमात रवि, दशमात बुध-शुक्र, लाभात शनी-प्लूटो, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

राशीच्या लाभात असलेला शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसाडीतून तूर्त सुटका झाल्याने ही प्रचीती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करणारे शत्रु सुतासारखे सरळ होतील किंवा नष्ट होतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. संततीच्या बाबतीत काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. नातेवाईक किंवा लबाड मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तीमत्व प्रभावशाली होईल. संसारात चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्याची आवड वाटेल. शरीर प्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. वाढत्या वयाबरोबर शरीर स्थूल होण्याची शक्यता. चालण्याचा व्यायाम करा. वरिष्ठाच्या कृपेने उच्चपद प्राप्त होईल.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या