Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकला व व्यापारातून धनप्राप्ती

कला व व्यापारातून धनप्राप्ती

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात बुध-शुक्र, चतुर्थात शनी-प्लूटो, पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरू, सप्तमात राहू-हर्षल. अष्टमात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे रा, री, रे,रो, ता,ती, तू, ते अशी आहेत. तुला राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी- शुक्र,तत्त्च-वायू, चर राशी असल्यामुळे स्वभाव चंचल. तुमच्यासाठी पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरुष, त्यामुळे काही स्त्रियांची वागणूक पुरुषांसारखी असते. स्वभाव-क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग-सफेद, शुभ दिवा- शुक्रवार, देवता- संतोषी माता, लक्ष्मी. शुभ अंक- 6, शुभ तारखा-6/15/24. मित्र राशी -मिथून, मकर, कुंभ, धनू, कर्क. शत्रु राशी- सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक व प्रभावी. नकारात्त्मक गुणईर्षा,घमेंड, अतिधूर्तता, मानसिक संतुलन चांगले. विनोदीवृत्ती.

द्वितीय स्थानातील सहाकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. पिताश्री किंवा चुलते वगैरे कडून अर्थिक सहाय्यता मिळण्याची शक्यता आहे. खर्चिक व उदार स्वभावाला लगाम द्या. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. कर्जापासून दूर रहा.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजार्‍यांशी संबंध चांगले राहील्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललित कलांत प्रगती होईल. नीटनेटकेपणाने काम केल्यामुळे मानसिक समाधान वाढेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात रवि-बुध, चतुर्थात शुक्र- शनि-प्लूटो, , पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरू, सप्तमात राहू-हर्शल, अष्टमात- मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ मोठ्या व्यापार्‍यांशी ओळख होईल. त्यामुळे उलाढालीत वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. गूढविद्याविषयी आकर्षण वाटेल. तृतीयातील बुधामुळे साहसाकडे कल राहील. विद्याव्यासंगात भर पडेल. लोकहिताची कामे कराल. व्यापारी लोकांशी मैत्री होईल. कला व व्यापार यांच्या संगमातून धनप्राप्तीचा वेग वाढेल.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधूर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल.

वाहनसुख चांगले मिळेल. नवीन वाहन खरेदीस हा महिना चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळता राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात नेपच्यून आहे. विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असाल तर पंचमातील नेपच्यून योग्य शाखेत प्रवेश करून देईल.

शुभ तारखा – 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 28, 26, 27

फेब्रुवारी – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात बुध, चतुर्थात रवि-प्लूटो, पंचमात नेपच्यून-शुक्र-शनी, षष्ठात गुरू, सप्तमात राहू-हर्षल, अष्टमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठात गुरू इाहे. सहावा गुरू चांगले नाही असे समजले जाते. शत्रु जिंकण्याची शक्यता आहे. मात्र वैद्यकीय व्यवसायास हा गुरु पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा फार आवडेल. नोकर वर्गाला हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची किंवा इच्छित स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. नियमीत हलका व्यायाम करा. प्रकृती निरोगी राहील. मात्र पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू राहतील.

सप्तमात हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारीक अनुभव येतील. मुळात विवाह फार उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाहसंंबंधी अगदी ठरला असे वाटावे व ऐनवेळी विवाह दुसर्‍या स्थळी व्हावा असाही काहीसा अनुभव येईल. विरोधकांवर नैतिक विजय मिळेल. परंतू त्यातून आर्थिक लाभ मात्र काहीच होणार नाही.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी- पंचमातील नेपच्यून विद्यार्थ्यांना अंतःस्फूर्ती प्रदान करील. पाठांतरासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. सतत वाचन केल्यास कोणताही विषय अवघड जाणार नाही.

शुभ तारखा – 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या