
सौ. वंदना अनिल दिवाणे
ऑगस्ट - 2022
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, तृतीयात केतू, सप्तमात प्लुटो-शनी, अष्टमात गुरु-नेपच्यून, नवमात राहू-हर्शल. दशमात मंगळ,व्ययात रवि-शुक्र अशी ग्रहस्थितीे आहे.
तुमची रास - राशीची आद्याक्षरे मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग- पुरूष, सत्वगुणी, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्तकारक प्रकृती.राशीचा अंमल हृदयावर आहे. शुभदिवस- बुधवार, रविवार. शुभ अंक-1, शुभ तारखा- 1/10/19/28. शत्रुराशी- मिथून, कन्या, मेष, धनु. शत्रुराशी- तुला, मकर, कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास, धोकादायक ठरु शकतो. मितभाषी, स्वतंत्र वृत्ती, मातृभक्त, शेतीची आवड.
दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यातून फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे कठीण होईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहील. तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाही.
स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्या महिलांसाठी त्रासदायक आहे.
विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.
शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31
सप्टेंबर - 2022
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि- शुक्र, द्वितीयात बुध, तृतीयात केतू, षष्ठात शनी-प्लुटो, अष्टमात गुरू-नेपच्यून, नवमात राहू- हर्षल,दशमसत मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.
तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्यांना विशेष प्रचिती येईल. कामाच्या घाईगर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. स्वभाव उदार राहील. थोडासा लोभीही राहील. बुद्धी तीव्र राहील. पित्ताचा त्रास असेल. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यस्त राहणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.
सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावे. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरवितांना नीट चौकशी करावी अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहिण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.
शुभ तारखा - 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30
ऑक्टोबर- 2022
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध-शुक्र, तृतीयात केतू, षष्ठात शनी-प्लूटो, सप्तमात नेपच्यून, अष्टमात गुरू, नवमात राहू-हर्शल, दशमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.
षष्ठात शनी आहे. शत्रुवर मात कराल. थोरांशी मैत्री होईल. देश व स्वधर्म याबद्दल आदर वाटेल. हाताखालचे लोक खूश रहातील. सत्कर्म घडतील. ग्रामीण भागातील शेतकर्यांना पशुधनापासून धनप्राप्ती होईल. अध्यात्माची आवड वाटेल. गूढशास्त्राची आवड वाटेल.
अष्टमात गुरू आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. पचनक्रीयेसंबंधी आजार संभवतात. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृत धनप्राप्तीचा योग आहे. पण याच्या पाठीमागे लागू नये. असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. ढोंगीपणाच्या नादी लागू नये.
लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक होईल. त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. चेहर्यावर प्रसन्नता झळकेल. अडी अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाल.
स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी- लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्या अर्थाने उपभोग घ्याल.
शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31