Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकमी श्रमात अधिक धनप्राप्ती

कमी श्रमात अधिक धनप्राप्ती

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी रवि-बुध-शुक्र-केतू, षष्ठात शनी-प्लूटो, सप्तमात नेपच्यून, अष्टमात गुरू,नवमात राहू-हर्षल. लाभात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे मा,मी, मू, मे, मो, टा, टी, टू अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व-अग्नी, स्थिर रास असल्याने

जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, सत्वगुणी, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, प्रकृती-पित्तकारक. राशीचा अंमल हृद्यावर आहे. सतर्क रहावे. शुभ दिवस-रविवार, बुधवार. सूर्य उपासना लाभदायक आहे. शुभ अंक – 1, शुभ तारखा- 1/10/19/28. मित्रराशी- मिथून, कन्या, मेष, धनु. शत्रुराशी- तुला, मकर, कुंभ, पराक्रमी, अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास, धोकादायक ठरू शकतो याचे सदैव स्मरण असू द्यावे. मितभाषी, स्वतंत्रवृत्ती. मातृभक्त, शेतीची आवड.

तृतीयस्थानी रवि आहे. पराक्रमाला जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाची सहज छाप पडेल. शास्त्रीय विषय व ललित कला यांची आवड वाटेल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. प्रवासाची आवड वाटेल. काहींना तशी संधी मिळेलही राजकारणी लोकांची सत्तेकडे वाटचाल सुरू होईल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे नातेवाईक व शेजार्‍यांशी संबंध चांगले राहील्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललित कलांत प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमेश गुरू आहे. विद्यार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील. मात्र आळस झाडून नियमीत अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे हे रामदासांचे वचन लक्षात ठेवावे.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशी तृतीयस्थानी केतू, चतुर्थात रवि, पंचमात बुध-शुक्र, षष्ठात शनि-प्लूटो, सप्तमात नेपच्यून, अष्टमात गुरू, नवमात राहू-हर्शल, लाभात- मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. काही ढोंगी, मतलबी, लबाड असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगत असेल तर भांडणाचे प्रसंग वारंवार येतील. स्थावर इस्टेटीसंंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत बदल होईल. पुत्रसुख उत्तम मिळेल. उपासनेत मन लागल्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश येईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. अर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे जमेल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळू शकेल. एखादे प्रतिष्ठेचे पद मिळेल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावे. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरवतांना नीट चौकशी करा. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी – 2023

महिन्याच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमात रवि-बुध, षष्ठात शनी-शुक्र-प्लूटो, सप्तमात नेपच्यून, अष्टमात गुरू, नवमात राहू-हर्षल, दशमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात गुरू आहे. स्वास्थ उत्तम राहील. पचनक्रीयेसंबंधी किंवा इतर आजार संभवतात. मात्र गंभीर धोका नाही. योगसाधना अवश्य करा. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृतधन प्राप्तीचाही योग आहे. पण त्याच्या पाठीमागे लागू नये. अन्यथा हा लाभ मिळता मिळता राहून जाईल. दुःखी, उदास लोकांचा सहवास मिळेल. त्याचा जीवनावर परिणाम होऊ देऊ नये. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

षष्ठात शनी आहे. शत्रुवर मात कराल. शत्रुचा पराभव मोठ्या कौशल्याने करू शकाल. थोर लोकांशी मैत्री होईल. देश व स्वधर्म याबद्दल आदर वाटेल. हाताखालचेेे लोक खूष राहतील. सत्कर्मे घडतील. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना पशुपालनापासून धनप्राप्ती होईल. अध्यात्माची आवड वाटेल. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी– विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 28, 26, 27

- Advertisment -

ताज्या बातम्या