Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधधनप्राप्तीची गती वाढेल

धनप्राप्तीची गती वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी मंगळ, पंचमात केतू, अष्टमात-प्लूटो, नवमात शनि, दशमात रवि-बुध-गुरू-नेपच्यून, लाभात राहू-शुक्र-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का,की,कू,घ,गं, छा, के, को ही आहेत. राशीचे चिन्ह स्त्री पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा तर पुरूषाच्या हातात गदा आहे. राशी स्वामी- बुध, तत्त्व – वायु असल्याने मधून मधून भडकण्याची सवय. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण-क्षूद्र, स्वभाव-क्रूर, प्रकृती त्रिदोष, राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभ रंग- हिरवा, शुभ वार-बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर स्वभाव, बोलण्यात चातुर्य,

दशमस्थानतील रविमुळे महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना याची जास्त प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता व पुढारी प्रचारकार्य करण्यात चांगले यश मिळेल. पितृसुख उत्तम मिळेल.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कला कौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1,2,4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ-शुक्र , पंचमात केतू, अष्टमात प्लूटो, नवमात शनि, दशमात नेपच्यून, लाभात रवि-बुध-गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

लाभात गुरू आहे. हा गुरू तुमच्यासाठी लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील . मित्रांचा तुमच्यामुळे चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले मिळेल. वाहनखरेदीचा विचार असेल तर आताच उरकून घ्यावा. थोरांचा स्नेह संपादन होईल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोेबर भाग्योदयास प्रारंभ होईल. संततीसुख चांगले राहील. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला असेल. अंतर्मनाने पुढे घडणार्‍या घटना आधीच कळून येतील.

लाभात असलेला राहू अभिमानाची मात्रा वाढवेल. अहंकाराची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी.

द्वितीयात शुक्र आहे. व्यक्तीमत्वाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीची गती वाढेल. धनप्राप्तीचे रहस्य लोकसंग्रहात दडलेले आहे आणि लोकसंग्रहाचे रहस्य व्यक्तीमत्वात याची प्रचिती येईल.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. मे महिना सुट्टीचा महीना खेळ व मनोरंजन याकडे लक्ष न देता पुढील वर्षाच्या अभ्यासाची तयारी करावी म्हणजे शैक्षणिेक वर्ष आरामदायी जाईल.

शुभ तारखा – 2, 3, 7, 9, 10, 12, 15 16, 21, 22, 24, 25, 28, 29,30

जून – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ-शुक्र, पंचमात केतू, अष्टमात प्लूटो, नवमात शनि,दशमात नेपच्यून, लाभात बुध-गुरू-राहू- हर्षल, अशी ग्रहस्थिती आहे.

लाभस्थानी बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू बरेच वेळा सिद्धीस जातील. शत्रुंनाही गोड बोलून वश कराल. संगीताची आवड वाटेल. सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध चांगला समजला जातो. त्यातून आध्यात्मिक उन्नती साध्य करु शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापक यांच्या विद्वत्तेचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास त्यात प्रगती होईल.

पंचमात केतू आहे. या ठिकाणचा केतू धर्माचरण करण्याची ओढ लावेल. उपासनेत चांगले यश मिळेल.याठिकाणी केतू असता संसारसुखात अडचणी येतात.

मुलांच्या आरोग्याविषयी तक्रारी निर्माण होतील. मोठ्या मुलांची वाकणूक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा नेहमी नाराज राहील. राजकारणी लोकांना सत्तेत असलेल्या सरकारकछून त्रास होण्याची भिती आहे.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारी पाजारी योंच संबंध चांगले राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी असेल. गायनवादनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणामुळे केल्याने मानसिक समाधान मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी- शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 11, 12, 14, 19, 20, 21, 23,24, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या