स्थावर इस्टेटीपासून विशेष उत्पन्न

त्रैमासिक भविष्य - मिथून
त्रैमासिक भविष्य - मिथून
त्रैमासिक भविष्य - मिथून Quarterly future - Gemini

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी रवि- शुक्र, तृतीयात बुध, पंचमात केतू, नवमात प्लुटो-शनी, दशमात गुरू-नेपच्यून, लाभात राहू-हर्शल. व्ययात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे का,की, कू, ध, गं, छा, के, को, हा अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री-पुरूष युगूल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरूषाच्या हातात गदा असे आहे. राशी स्वामी-बुध, तत्व-वायु, असल्याने मधून मधून भडकण्याची सवय. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग- पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण-शूद्र, स्वभाव-क्रूर, प्रकृती-त्रिदोषयुक्त. राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभ रंग-हिरवा, शुभ वार-बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती. अभ्यासू वृत्ती.

पंचमात केतू आहे. याठिकाणी केतू असता संसारसुखात अडचणी येतात. मुलांच्या प्रकृतीविषणी तक्रारी निर्माण होतात. मात्र मुली दिर्घायुषी होतात. पत्नीचा चेहरा नेहमी उतरलेला असेल. सरकारकडून काही त्रास होण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल. शेजारणी हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या तृतीयस्थानी रवि- शुक्र, चतुर्थात बुध, पंचमात केतू, अष्टमात शनी-प्लुटो, दशमात गुरू-नेपच्यून, लाभात राहू-हर्शल, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयातील रविमुळे पराक्रमाला जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर प्रभावी व्यक्तीमत्वाचीे सहज छाप पडेल. शास्त्रीय व ललीतकलामध्ये आवड वाटेल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. प्रवासाची फार आवड वाटेल. कोणत्याही प्रकारच्या लोकांशी सहज जुळवून मेैत्री करणे जमेल. स्पर्धात्मक कार्यक्रमात भाग घ्यावासा वाटेल. अशा प्रकारच्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा व वेळेचा अव्यय होतो आणि हाती काहीच लागत नाही. नातेवाईकांशी पटणार नाही. वडीलांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगले राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी मंगळ, रवि-बुध-शुक्र, पंचमात केतू, अष्टमात शनी-प्लूटो, नवमात नेपच्यून, दशमात गुरू, लाभात राहू-हर्शल, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थस्थानी शुक्र आहे. आनंदीे वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत वाढ होईल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक राहील. मातेची सेवा कराल. वाहनसुख चांगले मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास हा महिना त्यासाठी चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून विशेष उत्पन्न मिळेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. गुरूजनांवर प्रेम राहील.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी- शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com