शनिकृपेने धनसंग्रह होईल

jalgaon-digital
4 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू-हर्षल-शुक्र, तृतीयात मंगळ, सप्तमात-केतू, दशमात प्लुटो, लाभात-शनि, व्ययात रवि-बुध-गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे चू, चे, चो, ला,ली,ले,लो आ अशी आहेत. राशी चिन्ह मेंंढा आहे. राशी स्वामी -मंगळ, तत्त्व-अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग-लाल, शुभ रत्न-पोवळे, शुभ दिवस-मंगळवार, रविवार. देवता-शिव, भैरव,मारूती. शुभ अंक-9, शुभ तारखा-9/18/27. मित्र राशी- सिंह,तुला, धनु. शत्रु राशी- मिथुन, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी. कुटुंबाचे उत्तम्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

लग्नी शुुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. कामात दंग रहाल. स्वतःची जागा, संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यग्र रहाणे आवाडते.

स्त्रियांसाठी – तनुस्थानी शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. शस महिन्यात लेखनाचा सराव जितका वाढवाल तितक्या प्रमाणात टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि-बुध-गुरू-राहू-हर्षल, तृतीयात मंगळ-शुक्र, सप्तमात केतू, दशमात प्लूटेा, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

लाभात असलेला शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. कुरघोडी करणारे शत्रु नष्ट तरी होतील किंवा सुतासारखे सरळ तरी होतील. तेजस्वीपणाला धार चढेल. धनसंग्रह करणे शक्य होईल. स्त्रियांसाठी आवश्यक वस्तुंचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांचा विशेष फायदा होईल. संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. लबाडांकडून फसवणूक होऊ शकते.

व्ययात नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना आरोपी टीपण्यात यश मिळेल. हॉस्पिटल व तुरूंगाशी संबंधित कामापासून लाभ होतील. लोाकोपयोगी काम करण्यात आनंद वाटेल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललित कलामध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – स्वास्थ्याची काळजी घ्यावी. मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना नुसतेखच खेळ व मनोरंजनाकडे लक्ष न देता इतर अ‍ॅक्टीव्हीटी व पुढील वर्षाच्या अभ्यासाची ओळख करून घ्यावी म्हणजे शैक्षणिक वर्ष आरामदायी जाईल.

शुभ तारखा – 2,3, 7, 9, 10, 12,15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30

जून – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-गुरू-राहू-हर्षल, द्वितीयात रवि, चतुर्थात मंगळ-शुक्र, सप्तमात-केतू, दशमात प्लूटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहनापासून अपघात होण्याची शक्यता संभवते काळजी घ्या. राहत्या घरी आग किंवा चोरीची भिती. इस्टेटीचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. ज्येष्ठांनी घरातील मंडळींशी जमवून घ्यावे. नोकरी व्यवसायााच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक आहे. कापूस, चांदी, हिरे व्यापार्‍यांकरीता हा महिना चांगला आहे. वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. बंधुसुख उत्तम मिळेल.

राशीच्या तनुस्थानी हर्षल असल्यामुळे धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. राजकारणात असाल तर भाषणातून आश्वासनाचा पा्ऊस पाडाल. मात्र अनुयायी व श्रोतेगण त्यावर विश्वास ठेवतील असे नाही.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 6, 7,8, 10,11, 12,14, 19, 20,21, 23, 24, 27, 28, 29

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *