Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आय वाढेल

आर्थिक आय वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, चतुर्थात रवि-बुध-शुक्र, षष्ठात केतू, नवमात शनी-प्लूटो, दशमात नेपच्यून, लाभात गुरू, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी शुक्र, रास पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली आहे. राशी स्वरूप स्थिर काहीसा आळशी. ऐषोआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी. रजोगुणी. वर्ण वैश्य. राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट व प्रभावी असल्याने वक्तृत्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न- हिरा, शुभ रंग- हिरवा व पांढरा. देवता- लक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारीख -6/15/24. मित्र राशी- कुंभ, मकर. शत्रु राशी- सिंंह,धनु, मीन. चिकाटी व निश्चयी. कष्टाळू स्वभाव. तेजस्वी, बुद्धीवान.

चतुर्थातील रवि राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. निवडणुकीच्या सिंहासन संग्राम संपलेला असल्यास सत्ताधारी पक्षाच्या संबंधित कार्यकर्त्याच्या पदरात काही ना काही लाभ पडेल. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत सहभागी होण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीवाडीपासून चांगला फायदा होईल.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी -माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीधनस्थानी मंगळ, षष्ठात रवि-बुध-केतू-शुक्र, नवमात शनि-प्लूटो, दशमात नेपच्यून, लाभात गुरू, व्ययात राहू-हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थानातील मंगळ आर्थिक आय वाढवील.खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पशूपासून पिडा संभवते.

मंगळ-गुरू जिरेकादश योग होत आहे. नवनवीन कल्पना काढून तुम्ही अर्थप्राप्ती वाढ करू शकाल. क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना उत्तम यश प्राप्त होईल. मोठे व्यवसाय करणार्‍या उद्योगपतींना आपले साम्राज्य विस्तृत करता येईल. सामाजिक कार्य करणार्‍यांना त्यांच्या सत्यप्रियतेमुळे समाजात आदर व सन्मान मिळेल. अभिनय व अन्य कलावंतांच्या कौशल्यात वाढ झाल्याने उच्च दर्जा प्राप्त करता येईल. प्रकृतीची उत्तम साथ राहील.

लाभस्थानी असलेला गुरू लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचार असल्यास तो आताच करा. थोरांचा स्नेह संपादन कराल. पुत्र जन्माबरोबर भाग्योदय होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला असेल.

स्त्रियांसाठी – षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. सप्तमातील गुरूमुळे जोडीदाराशी चांगले पटेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, षष्ठात केतू,सप्तमात रवि, अष्टमात बुध-शुक्र, नवमात शनी-प्लूटो, लाभात-गुरु, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्या दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुष होऊन समाजातील छबी आणखी उजळेल.

अष्टमातील शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहाय्यता मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्ती स्वबळावर आधारित असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गांचा अवलंब करू नये. असे धन म्हणजे विषासारखे भयंकर आहे.

नवमात प्लूटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यात आता यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी भावना राहील. सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

षष्टस्थानी केतू असता बंधूशी चांगले जमेल. मातुल पक्षाकडून मात्र मानहानी होण्याची शक्यता आहे. साधुजनांचा सहवास लाभेल.

स्त्रियांसाठी – शुक्र अष्टमात आहे. स्त्री वर्गाला अभिमानाची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष असल्याने पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या