Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक उत्तम राहील

आर्थिक आवक उत्तम राहील

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी मंगळ, द्वितीयात रवि-बुध, षष्ठात केतू नवमात प्लूटो, दशमात शनि-, लाभात रवि-बुुध-गुरू-नेपच्यून, व्ययात शूक्र-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे इ,उ,ए, ओ, वा, वी, वू, वे, वो इशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी-शुक्र,रास-पृथ्वी, तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली आहे. राशी स्वरूप स्थिर. काहीसे आळशी ऐषआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची आहे.े लिंग स्त्री असल्याने स्वभाव काहीसा लाघवी रजोगुणी, वर्ण वैश्य. राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट व प्रभावी असल्याने अभ्यासाने वक्तृत्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग-हिरवा, देवता-लक्ष्मी, संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारीख – 6/15/28. मित्र राशी-मकर, कुंभ, शत्रु राशी- सिंह, धनु, मीन. चिकाटी व निश्चयी. कष्टाळू स्वभाव, तेजस्वी, बुद्धीमान.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील.शत्रुंनाही गोड बोलून वश कराल. संगीताची फार आवड वाटेल. सभासंमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध फार चांगला आहे. त्यातून आध्यात्मिक उन्नतीही साध्य होईल.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी –तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशी धनस्थानी मंगळ-शुक्र, षष्ठात केतू, नवमात प्लूटो, दशमात शनी, लाभात नेपच्यून, व्ययात रवि-बुध-गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययस्थानी गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवावे. ब्रम्हांडाच्या पाठीमागे असलेल्या ईश्वराच्या सत्तेबद्दल म्हणावा असा विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकण्याची सवय कमी करावी. पैसा अनाठायी खर्च करू नये. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. कोणाशी मैत्री करावी व कोणाशी करू नये. याचा विवेक बाळगावा. धार्मिक संस्थेचे अधिपत्य करू शकाल. अध्यात्मात प्रगती होईल. लोकांशी संबंधित नसलेल्या खात्यात नोकरी मिळेल. कर्जापासून दूर रहावे. कर्ज घ्यावेच लागले तर हप्ते वेळेवर भरावे.

दशमात शनी आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील. आपल्या बुद्धीमत्तेने लोकांना चकीत कराल. त्यामुळे जनमानसात आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल. सत्तापक्षातील प्रतिनिधींना मंत्रीपद प्राप्त होण्याची शक्यता आहे.

नवमात प्लूटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी विश्वबंधूत्वाची भावना राहील. आध्यात्त्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहिल.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30

जून – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, तृतीयात मंगळ-शुक्र, षष्ठात केतू, नवमात प्लूटो, दशमात शनि, लाभात नेपच्यून, व्ययात बुध-गुरू-राहू-हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊवृत्ती चांगली असल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग राहील. भावंडासाठी खर्च सहन करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील. दैवी कृपेची प्रचिती येईल.

तृतीयात शुक्र आहे. कोणतेही काम नीटनेटकेपणाने पार पाडाल. नातेवाईक व शेजारी पाजारी यांचे उत्तम सुख मिळेल. अविवाहीत तरूणांचे विवाह सहज जुळून येतील. कृपन वृत्ती राहील. पराक्रमाला जोर येईल. आळसाचे आकर्षण वाटेल. बंधूप्रियता राहील. डोळ्यांच्या विकाराची शक्यता. स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जमतील.

लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील. पित्तवासाचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घेतली तर गंभीर आजार होणार नाही.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी-शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10,11, 12, 14, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या