Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधव्यापार्‍यांना भागीदारीत लाभ

व्यापार्‍यांना भागीदारीत लाभ

सौ. वंदना अनिल दिवाणे

मे – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थात-शनी, पंचमात – नेपच्यून, षष्ठात रवि-बुध-गुरू-राहू-शुक्र, नवमात मंगळ-शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ, देवता-शिव, हनुमान,भैरव. शुभ अंक-9, शुभ तारखा-9/18/27. मित्र राशी- कर्क, मीन. शत्रुराशी-मेष, सिंंह, धनु. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार कराल. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधी, डॉक्टर्ससाठी चांगली रास. दृढप्रतिज्ञ, साहसी व कर्मठ.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील.

स्त्रियांसाठी – चतुर्थस्थानी शनी आहे. महिलांसाठी विशेष चांगला नाही. स्वयंरोजगारातून आथिर्र्र्क उत्पन्नात वाढ करावी म्हणजे खर्चास कठीण जाणार नाही. वाढत्या महागाईमुळे घरातील खर्चाचे बजेट सांभाळणे कठीण जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – स्वास्थ्याची काळजी घ्यावी. मे महिना म्हणजे सुटीचा महिना. खेळ व मनोरंजन याकडे लक्ष न देता पुढील वर्षाच्या अभ्यासाची तयारी करावी. म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष आरामदायी जाईल.

शुभ तारखा – 2, 3, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30

जून – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थात शनि, पंचमात-नेपच्यून, षष्ठात बुध-गुरू-शुक्र-राहू , सप्तमात रवि, नवमात मंगळ-शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमस्थानी रवि आहे. व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याचा योग आहे. आनंंदी वृत्तीला रागाचे गालबोट लागू नये याची काळजी घ्या. थोर व्यक्तींशी वाद करण्याची इच्छा होईल. पण बोलण्यात नकळत त्यांचा अपमान होऊ नये याचे भान ठेवा. स्पर्धेत विजय मिळेल. राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल.

षष्ठस्थानी राहू आहे. आतापर्यंज त्रासदायक ठरणार्‍या शत्रुंचा समाचार घेण्याची वेळ आता प्राप्त झाली आहे. धाडसाने दोन हात केल्यास त्यांचा पूर्ण पराभव करण्यास निश्चीतपणे यश मिळेल. पराक्रमाला जोर येईल.

स्त्रियांसाठी – पतीाराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेने रहा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 11, 12,14, 19, 20, 23, 24, 27, 28, 29

जुलै – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थात शनि, पंचमात-नेपच्यून, षष्ठात गुरू-राहू-हर्षल, अष्टमात रवि-बुध, नवमात शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्या दुष्टचक्रात अडकून नष्ट होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाचे संबंधित आलेले पाहुणे खूश होऊन तुमची समाजातील छबी आणखीनच उजळेल व प्रगती होईल.

षष्ठस्थानी गुरू आहे. सहावा गुरू चांगला नाही असे मानले जाते. शत्रु जिंकण्याची व वाईट व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीच धंद्याला हा गुरू पोषक आहे. नोकरीमध्ये पदोन्नती व बदली होण्याची शक्यता आहे. प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी चालण्याचा व्यायाम करा. मात्र पचनाच्या तक्रारी सुरू रहातील.

रवि मंगळ जिरेकादश योगामुळे धाडसी वृत्ती राहील.उदारवृत्ती राहील. अधिकारी व मोठ्या लोकांशी संबंध राहतील. अधिकार प्राप्त होतील.

स्त्रियांसाठी – भाग्यस्थानी शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्यांच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 3, 7, 8, 10, 11,19, 23, 24, 26, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या