Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधधनप्राप्तीची गती वाढेल

धनप्राप्तीची गती वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध, द्वितीयात शुक्र, तृतीयात- मंगळ, पंचमात केतू, अष्टमात प्लूटो , नवमात शनी, दशमात नेपच्यून, लाभात गुरू-राहू-हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का, की, कू, घ, गं, छा, के, को, हा अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरूषाच्या हातात गदा आहे. राशी स्वामी बुध, तत्त्व वायु असल्याने मधून मधून भडकण्याची सवय आहे. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण-क्षुद्र, स्वभाव क्रूर, त्रिदोषयुक्त प्रकृती आहे. राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न- पाचू, शुभ रंग-हिरवा, शुभ वार-बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्यविनोदी, खेळकर स्वभाव, बोलण्यात चातुर्य. तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्‍या कार्यकर्त्याला याची प्रचिती येईल. स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या.

स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 3, 7, 8, 10, 11, 19, 23, 24, 26, 28

ऑगस्ट – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशी धनस्थानी रवि, तृतीयात -मंगळ-बुध-शुक्र, पंचमात केतू, अष्टमात प्लूटो, नवमात शनि, दशमात नेपच्यून, लाभात गुरू-राहू-हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीय स्थानी मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. लढाऊ वृत्ती राहील्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग असेल. भावंडांसाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील. दैवी कृपेची प्रचिती येईल.

लाभस्थानी गुरू आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा तुमच्यामुळे चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचार असल्यास तो आताच उरकून घ्यावा. थोर लोकांचा स्नेह संपादन होईल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबर भाग्योदयास प्रारंभ होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तुंनी भरलेला असेल. अंतर्मनाने पुढे घडणार्‍या घटना आधीच कळून येतील.

तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ मोठ्या व्यापार्‍यांची ओळख होईल. त्यामुळे उलाढालीतही वृद्धी होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भावी घटनांविषयी स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होईल.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे चातुर्याचे ठरेल. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी शुक्र, तृतीयात रवि-बुध, चतुर्थात मंगळ, पंचमात केतू, अष्टमात केतू, नवमात शनि,दशमात नेपच्यून, लाभात गुरू-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयस्थानी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीची गती वाढेल. धनप्राप्तीचे रहस्य लोकसंग्रहात दडलेले आहे. आणि लोकसंग्रहाचे रहस्य व्यक्तीमत्वात दडलेले आहे याची प्रचिती तुम्हाला येईल.

पंचमस्थानी केतू आहे. हा केतू धर्माचरणाची ओढ लावेल. उपासनेत चांगले यश मिळेल. संसर सुखात अडचणी येतील. मुलांविषयी तक्रारी निर्माण होतील. मोठ्या मुलाची वागणुक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा नाराज असल्यासारखा वाटेल. राजकारणी लोकांना सत्तेत असलेल्या सरकारकडून त्रास संभवतो. याठिकाणचा केतू मांत्रिक विद्येची आवड निर्माण करतो. हलक्या लोकांची संगत आवडेल.

रवि -गुरू नवपंचम योग. या शुभयोगामुळे प्रकृती उत्तम राहील. श्रीमंत व थोर लोकांशी मैत्री होईल. नितीमत्तेत वृद्धी होईल. मोठ मोठ्या योजनांची जबाबदारी स्वीकारू शकाल. ध्येयावर दृष्टी ठेवून मार्गक्रमण कराल.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी तुमचा हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी- तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या