Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधव्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी कामे यापासून अर्थप्राप्ती

व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी कामे यापासून अर्थप्राप्ती

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, पंचमात रवि-बुध-शुक्र-केतू, अष्टमात शनी-प्लूटो, नवमात नेपच्यून, दशमात गुरू, लाभात राहू-हर्षल अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का, की, कू, घ, गं, छा,के, को, हा अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री-पुरूष युगूल असून स्त्रीच्या हातात वीणा पुरूषाच्या हातात गदा असे आहे. राशी स्वामी बुध, तत्त्व-वायु असल्याने अधून मधून भडकण्याची सवय.द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष, असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण-शुद्र, स्वभाव -क्रूर, प्रकृती-त्रिदोषयुक्त. राशीचे अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभ रंग-हिरवा, शुभ वार- बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासूवृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर स्वभाव, बोलण्यात चातुर्य.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावेसे वाटेल. चंचल बुद्धीमुळे विद्याभ्यासाम खंड पडेल. काहीही करू पैसा मिळवला पाहिजे अशी मनाला ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार, बेभरवसा बँकेेत गुंतवणूक अशाप्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसाही मिळेल पण असे व्यवहार सावधानतेने करावेत.

स्त्रियांसाठी – 2. व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचाा सराव वाढविणे फायदयाचे राहील.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशी पंचमस्थानी केतू, षष्ठात रवि, सप्तमात बुध-शुक्र, अष्टमात शनि-प्लूटो, नवमात नेपच्यून, दशमात गुरू, लाभात राहू-हर्शल, व्ययात- मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमास्थानी बुध आहे. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. भावी पत्नी सुविद्य असेल. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. त्यामुळे आर्थिक आवक वाढेल. कलाकौशल्यात प्रगती होईल. विनोदप्रियतेमुळे घरात व बाहेर तणाव राहणार नाही.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्त्री वर्गाशी चांगले संबंध राहतील. स्थावर इस्टेटीतून उपजिवीका होण्याइतके उत्पन्न मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उठसूट रागावणे चांगले नाही. रागावर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी काम यापासून अर्थप्राप्ती होईल.

स्त्रियांसाठी – सप्तमस्थानात शुक्र आहे. वैवाहिक सुख चांगले मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थामधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी – 2023

महिन्याच्या सुरुवातीला पंचमस्थानी मंगळ, सप्तमात रवि-बुध, अष्टमात शनी-शुक्र-प्लुटो, नवमात नेपच्यून, दशमात गुरू, लाभात राहू-हर्षल, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या. धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टावर आधारित असावी कमी श्रमात जास्त धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गांचा अवलंब टाळावा. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर आहे.

लाभात असलेला राहू अभिमानाची मात्रा वाढवील. अहंकाराची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. स्त्री वर्गाशी चांगले पटेल.

पंचमात केतू आहे. याठिकाणी केतू असल्यास संसार सुखात अडचणी येतात. मुलांच्या प्रकृतीविषयी तक्रारी निर्माण होतात.

स्त्रियांसाठी –अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी- विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 28, 26, 27

- Advertisment -

ताज्या बातम्या