Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधललितकलांपासून द्रव्यलाभ होईल

ललितकलांपासून द्रव्यलाभ होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी-प्लूटो, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात गुरू, चतुर्थात राहू-हर्षल. पंचमात मंगळ, दशमात केतू , लाभात रवि, व्ययात बुध-शुक्र अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खू, खो, गा, गी अशी आहेत. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी शनी आहे. तत्त्व पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटत रहाते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, तमोगुणी, वात प्रकृती, स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. इजा होऊ नये यासाठी काळजी घ्या. शुभरत्न-निलम, शुभ रंग- निळा, आकाशी, काळा. शुभ दिवस-शनिवार, देवता- शनि, शुभ अंक- 8, शुभ तारखा – 8/17/23. मित्रराशी- कुंभ, शत्रू राशी- सिंह, उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष,

एकादशात रवि आहे. आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या श्रमाचा मोबदला आता चांगल्याप्रकारे मिळू शकेल. पराक्रमाला जोर येईल. शत्रुवर विजय मिळवाल. संयम चांगला असल्यामुळे चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील राहतील.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि-बुध, शुक्र- शनि-प्लूटो, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात गुरू, चतुर्थात राहू-हर्शल, पंचमात- मंगळ, दशमात केतू , व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे नवील काम लवकर आत्मसात करून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुकांना मनासारखा साथीदार मिळेल.

तनुस्थानी शनी आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेलच शिवाय नियमीत बचत करणे सोपे जाईल. प्रमाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भाविकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह करू नये.

पंचमस्थानी मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. पुत्राविषयी चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खांची संगत टाळावी. ऐशोआरामाची वृत्ती राहील. जवळपास प्रवासाची शक्यता आहे. क्रिडा क्षेत्रात आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 24, 26, 27

फेब्रुवारी – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-प्लूटो, द्वितीयात नेपच्यून-शुक्र-शनी, तृतीयात गुरू, चतुर्थात राहू-हर्षल, पंचमात मंगळ, दशमात केतू, व्ययात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायदेशीर राहील. कंजूसपणा सोडून द्या. धनसंग्रहात अडचणी येतील. हा गुरू स्वराशीचा असल्याने शुभ फळ मिळेल. शेजारी व मित्र यांचे सहकार्य मिळेल. राजकीय कार्यकर्ते व नेते यांच्यासाठी हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखवताही भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे दालन तुमच्यासमोर उघडे करेल. अन्य जणांचे लक्षही जाणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे, ललितकला, कथालेखन यापासून द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे.

मंगळ-गुरू हा शुभयोग आहे. प्रकृती उत्तम राहील. त्यामुळे कामात उत्साह राहील. सरकार दरबारी प्रतिष्ठा राहील. राजकारणी लोकांना याचा विशेष अनुभव येईल. कार्यक्षेत्रात हुशारी कल्पकता दाखवून पुढे याल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललित कलांमध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या