
सौ. वंदना अनिल दिवाणे
मार्च - 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लूटो, द्वितीयात रवि-बुध-शनि, तृतीयात शुक्र-गुरू-नेपच्यून, चतुर्थात राहू-हर्षल, पंचमात मंगळ, दशमात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.
तुमची रास - राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी- शनि, तत्व पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटत रहाते. दक्षिण दिशा फायद्याची. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य तमोगुणी. वात प्रकृती, स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम नियमीत घ्यावा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. गुडघ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. शुभ रत्न-निलम, शुभ रंग-निळा,आकाशी, काळा. शुभ दिवस- शनिवार. देवता- शनी. शुभ अंक-8, शुभ तारखा-8/17/26. मित्रराशी - कुंभ, शत्रुराशी- सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न.
द्वितीयातील रविमुळे वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. खर्चिक व उदार स्वभावाला लगाम लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. कर्जापासून दूरच रहा. घेतले तर वेळेवर हप्ते भरण्याची काळजी घ्यावी.
स्त्रियांसाठी - महिलांना पतीचे उत्तम सहकार्य मिळेल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा.उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.
विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.
शुभ तारखा - 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31
एप्रिल -2023
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी प्लुटो, द्वितीयात शनि, तृतीयात रवि-बुध-गुरू-नेपच्यून, चतुर्थात शुक्र-राहू - हर्षल, षष्ठात मंगळ, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थर्स्थात शुक्र आहे. आनंदीवृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर वातावरण खेळीमेळीचे राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक राहील. मातेची सेवा कराल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास हा महिना त्याच्यासाछर फारच चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सल्ला मिळेल. निवासस्थाना संदर्भात काही शुभ घटना घडतील .
तृतीयस्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमशील बनतो. मात्र अपेक्षेप्रमाण सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला मोलाचा राहील. कंजूषपणा करण्याकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतीलश भावंडांकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्रांकडून उत्तम सहकार्य मिळेल. राजकीय कार्यकर्ते नेत्यांना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखविता भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.
स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.
विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.
शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30
मे - 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लूटो, द्वितीयात शनी, तृतीयात - नेपच्यून,षष्ठस्थानी रवि-बुध-गुरु-राहू-हर्शल, चतुर्थात मंगळ-शुक्र, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगात कामाचा कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, प्रयत्न, वेळ वाया जातो आणि शेवटी पदरात काहीही पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. पिताश्रींकडून काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता कमीच आहे. मातृसुखातही काही ना काही अडचणी येतील. मात्र निराश होण्याचे काहीच कारण नाही.काळ कधीही थांबून रहात नाही.
दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे तुम्हाला सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना नोेकरी मिळण्याचे योग आहे. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. बुद्धी तीक्ष्ण असेल. कारागिरी आवश्यक काम चांगले जमेल. निचांची संगत टाळा अन्यथा नसत्या भानगडीत अडकाल. प्रवास घडेल त्यातून आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवितांना सावध रहावे अपघात होण्याची शक्यता आहे.
द्वितीयात शनी असल्यामुळे आर्थिक आवक वाढेल त्याचबरोबर बचतीचे धडे शिकाल.
स्त्रियांसाठी -नातेवाईक च शेजारी पाजारी यांच्यांशी संबंंध चांगले राहील्याने महिलांचा स्वभाव आनंदी व धाडसी राहील. ललीत कलांमध्ये प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी-तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल. शुभ तारखा - 2, 3, 4, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30