Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधया नियमांकडे लक्ष दिल्यास ठरतील लाभदायक

या नियमांकडे लक्ष दिल्यास ठरतील लाभदायक

प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. प्रत्येक जण घरातल्या देवाची पूजा करतो. पण घरात असलेल्या देवघरासाठी देखील काही विशेष नियम आहे. या नियमांचं पालन देखील तितकचं महत्त्वाचं आहे. आज आपण जाणून घेऊ घरातल्या किंवा ऑफिसमधल्या देवघरात पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी..

वास्तुशास्त्रानुसार घराचे देवघर नेहमी ईशान्य दिशेला असायला हवं. पूजेचे घर कधीही दक्षिणेकडे नसावे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात.

देवघरासोबतच व्यक्तीने कोणत्या दिशेला तोंड करावे, हेही महत्त्वाचे आहे. मंदिरात लाल रंगाचा बल्ब लावू नका. असं केल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते. पांढर्‍या रंगाचा बल्ब लावल्याने घरात सकारात्मकता येते.

- Advertisement -

यासोबतच वास्तूनुसार घरामध्ये खंडित मूर्ती ठेवू नका. मूर्ती वेळेत पाण्यात विसर्जित करा. अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरात राहते.

देवघरात विसरुनही शिळी फुले ठेवू नका. देवघरातील भांडी स्वतंत्रपणे धुवा. देवघरातील भांड्यासाठी एक वेगळी जागा राहूद्या.

मंदिरात लाल रंगाच्या कापडाचा वापर करू नका, असं वास्तूतज्ञ सांगतात.

घरातील मंदिरात एकाचं देवीची अनेक फोटो लावू नका. घरात 2 पेक्षा अधिक शिवलिंग किंवा शंख ठेवू नका. कारण या गोष्टींची काळजी घेतली नाही तर घरात अशांतता निर्माण होते.

घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने धनलाभ होईल. रखडलेले पैसे देखील परत मिळतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या