Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधशाहिदच्या हातावरील प्रेमाच्या उत्कट रेषा!

शाहिदच्या हातावरील प्रेमाच्या उत्कट रेषा!

शाहिद कपूरचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी नवी दिल्लीत झाला. अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा आजमी यांचा तो पुत्र. शाहिदला लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने वयाच्या 15 व्या वर्षी श्यामक दावर यांच्या नृत्य संस्थेत प्रवेश तो पोहचला. दिल तो पागल है आणि ताल या चित्रपटांमध्ये समूह नृत्यातील गर्दीत तो चमकला त्याचे कारण हेच. दावर गाण्यांचे नृत्यदिग्दर्शक होते. शाहिदने किटकॅट आणि क्लोजअप या ब्रँड्ससाठी दूरचित्रवाणी जाहिरातींमध्ये काम केले. 1998 च्या मोहनदास बीएएलएलबी या दूरचित्रवाणी मालिकेत वडिलांच्या बरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

शाहिद रोमँटिक चित्रपट इश्क विश्क (2003) मध्ये अभिनेता म्हणून झळकला. तत्पूर्वी त्यानग नसीरुद्दीन शाह आणि सत्यदेव दुबे यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले. इष्क विश्क बॉक्स ऑफिसवर हिट झाला. शाहिदला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याचा विवाह हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहिद व करीना या जोडीचा जब वी मेट हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 2007 च्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहिद कपूर यांना त्यांच्या अभिनयासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले नामांकन मिळाले. याकाळात शाहिद-करीना ही जोडी सिनेजगतातील सर्वाधिक चर्चित जोडी होती. त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे ते लाईमलाईटमध्ये होते.

त्यांचे हे प्रेम प्रकरण माध्यमांतील चर्चेचा विषय होते. 2004 मध्ये फिदा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद व करीना एकमेकांना डेट करू लागले. नाजूक नात्याबद्दल सार्वजनिकपणे चर्चा होईल, असा वावर या जोडीचा होता. जब वी मेटच्या या

- Advertisement -

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हे जोडपे वेगळे झाले. त्यांचे मार्ग वेगळे झाल्यापासून शाहिदने मीडियापासून अंतर राखले.

शाहिद कपूर यांच्या हातावरची उत्कट रेषा

शाहिद कपूर यांच्या उजव्या हातावरची हृदय रेषा

शाहिदचेे उत्कट प्रेम, हृदय रेषा पहिल्या बोटाच्या पेर्‍यात जाऊन थांबल्याने आहे. रेषा बाणाने दाखविली आहे. हृदय रेषेचे गुणधर्म म्हणजे प्रेम, प्रेम भावना, वात्सल्य , द्वेष, मत्सर , व्यवहारीपणा इत्यादी होत. हृदय रेषेच्या तळ हातावरील स्थिती वरून व्यक्तीच्या भावना प्रगट होतात किंवा त्या समजून येतात. हृदयाला मन नसले तरी हस्तसामुद्रिक शास्त्रात हृदय रेषेवरून त्या व्यक्तीचे मन व तिच्या भावभावना ओळखता येतात. त्याचे अचूक निदान करता येते. शाहिद कपूर यांच्या उजव्या हातावरची हृदय रेषा पहिल्या बोटाच्या पेर्‍यात म्हणजे गुरु ग्रहावर बोटाच्या पेर्‍यापर्यंत जाऊन थांबली आहे. हृदय रेषा थेट पहिल्या बोटाच्या पेर्‍यात जाऊन रुतलेली असेल तर असे लोक आपल्या प्रियकरावर निस्सीम प्रेम करतात.

निस्सीम प्रेम ज्या व्यक्तिवर आहे किंवा जडले आहे ती व्यक्ती व तिच्यातले दोष निस्सीम प्रेम करणार्‍याला दिसत नाहीत. समोरची व्यक्ती स्वार्थी, लबाड, खोटारडी, बेगडी प्रेम करणारी, सहजी पलटणारी किंवा धोका देणारी, फक्त टाईम पास करणारी, विशिष्ट हेतू ठेवून प्रेम करणारी, प्रेम बसलेल्या व्यक्तीत किंवा प्रियकरात असलेले दोष त्यांना दिसत नाहीत. हे घडते ते फक्त जेव्हा हृदय रेषा पहिल्या बोटाच्या पेर्‍यात जाऊन रुतते तेव्हा. त्या स्थितीत प्रेम करणार्‍याचे प्रेम आंधळे असते. गुरु बोटाच्या पेर्‍यात हृदय रेषा गेल्याने नुसतेच प्रेम आंधळे असते असे नव्हे तर ती व्यक्ती अन्य दुसर्‍या विचार न करता समोरच्यावर विश्वास ठेवत असते. अशा व्यक्तींचा स्वभाव जन्मजात भावनाशील असतो. यांच्या भावना दुखावल्या जातात व यांना ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले त्यांचेकडूनच अपार दुःख सोसावे लागते. नंतरच यांचे डोळे उघडतात. शाहिदच्या प्रेमाच्या या उत्कट प्रेम भावनेविषयी आपण हस्तसामुद्रिकशास्त्रातील प्रमुख बाबी पाहणार आहोत. प्रेम प्रकरण होईल का? झाले तर ते यशस्वी होईल का. आदी अनेक प्रश्न तरुणाईच्याच नव्हे तर गृहस्थांच्या-वयस्कर व्यक्तींच्या मनात सुद्धा असतात.

प्रेमप्रकरणात वय आडवे येत नाही

समाजात स्त्री व पुरुषांचे लग्न झाले म्हणून प्रेम प्रकरणे थांबलेली नाहीत. प्रेम हे कधी होईल, कोठे होईल हे सांगता येत नाही. प्रेम किंवा प्रेमात पडण्यासाठी वयाची मर्यादा नाही.

आज आपण प्रेम जमण्याच्या शक्यतेची हातावरील रेषांची कारकत्वे व गुणधर्म पाहणार आहोत. प्रेम प्रकरणात हृदय रेषेचा व मस्तक रेषेचा मोठा सहभाग आहे. प्रेम प्रकरणांची ओळख किंवा प्रेम प्रकरण निश्चित होणार, ते सफल होईल का त्यात अडथळे आहेत का ? इत्यादी बाबी आपण हृदय रेषा व मस्तक रेषेच्या आकृतीनुसार पाहणार आहोत.

हृदय रेषेला गुरु ग्रहावर अनेक फाटे असू शकतात, काही, बोटांच्या पेर्‍याकडे, काही गुरु ग्रहावर थांबतात तर काही हृदय रेषेच्या खाली असलेल्या मस्तक रेषेस जाऊन मिळतात. हृदय रेषेचा फाटा आकृतीत दाखविल्याप्रमाणे मस्तक रेषेवर जाऊन थांबल्यास यांचे प्रेम प्रकरण होण्याची शक्यता जास्त असते. प्रेम प्रकरण जरी झाले तरी त्याचे परिणीती प्रेम विवाहातच होईल याची खात्री नसते. हातावरील इतर रेषा ग्रह यांचा अभ्यास करूनच प्रेम विवाह होईल कि नाही ते सांगता येईल.

प्रेमात जवळच्या नातलगा कडून विरोध अथवा वेदना

क्रमांक 1 ने बाणाने दाखविलेली हृदय रेषा व क्रमांक दोनची बाणाने दाखविलेली मस्तक रेषा होय. वरच्या फोटोमधे हृदय रेषेचे फाटे आयुष्य रेषा व मस्तक रेषेला छेदून मंगळ ग्रहावर थांबले आहेत. हृदय रेषा मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांना छेद देऊन अंगठ्याच्या आत म्हणजे खालच्या मंगळ ग्रहावर गेली असेल किंवा हृदय रेषेचे फाटे खालच्या मंगळ ग्रहावर जाऊन थांबले असतील तर प्रेम प्रकरणात वेदनांना सामोरे जावे लागते, प्रेम प्रकरण नसेल तर ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याच आयुष्यात फसवतात.

हृदय रेषेचे अनेक फाटे मस्तक रेषेकडे वळालेले ते बाणाने दाखविले आहेत. सहवास लाभलेल्या व्यक्तीवर अशा व्यक्ती आंधळा विश्वास ठेवतात. हृदय रेषेचे अनेक फाटे मस्तक रेषेकडे वळालेले असतील तर अश्या व्यक्ती दुसर्‍याच्या बोलण्यात येतात किंवा समोरची व्यक्तीच्या गोड बोलण्यावर या व्यक्ती विश्वास ठेवतात. यांचा विश्वास बसला कि या व्यक्ती सहवास लाभलेल्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवतात. त्यांच्या अधिपत्याखाली राहतात. त्यांचे सर्व बोल सत्य मानतात. त्यांच्या आहारी जातात. स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांचे आकर्षण किंवा विजातीय लिंगाचे आकर्षण हा मनुष्याचा स्वाभाविक भावनेचा अविष्कार आहे. प्रेमाच्या भावना फक्त तरुणाईलाच नव्हे तर वृद्धांना सुद्धा असतात. त्यांनाही प्रेमात गुदगुल्या होतात. तेही प्रेम प्रकरणात रमतात. प्रेम भावना – प्रियकर – प्रेयसीच्या वेगळ्या व इतर नाते संबंधातील प्रेम, प्रेमाच्या भावना व वात्सल्य हे नेहमी वेगळ्या स्थरावर असते. ते सुद्धा किती उत्कट, किती बेडगी हे प्रत्येकाच्या हातावर असलेल्या हृदय रेषेच्या स्थितीवरून कळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या