इरफान खान
इरफान खान
भविष्यवेध

तळहाताचे संकेत न देताच..!

भविष्य आपल्या हाती

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

प्रफुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड :

साहबजादे इरफान अलीखान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी खजुरिया गावात व टोंक जिल्हा राजस्थान येथे झाला. इरफान उत्तम क्रिकेट खेळायचा त्याची सी. के. नायडू ट्रॉफीसाठी निवड पण झाली होती पण तो त्या स्पर्धेत खेळला नाही. इरफानला अभिनय आवडत होता. त्याचे मामा जोधपूरला थिएटरमध्ये अभिनय करायचे. ते उत्तम अभिनय कलाकार असल्याने त्यांनी त्यांच्या भाच्याला छोट्याछोट्या नाटकात रोल मिळण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नाने इरफानचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला. पुढे त्यांनी एम. ए. ही पदवी घेतली व 1984 ला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथे प्रवेश मिळवला. नंतर अभिनयात करिअर करण्यासाठी इरफान मुंबईत आला त्याने एअर कंडिशनर दुरुस्तीच्या कंपनीत काम मिळवले.

1987 साली नायर यांच्या सलाम बॉम्बे या चित्रपटात इरफानला छोटा रोल मिळाला, पुढे दूरदर्शनच्या वेगवेगळ्या मालिकांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटविला. भारत एक खोज पासून चंद्रकांता, श्रीकांत अशा अनेक मालिकामधून त्याने सन 2001 पर्यंत काम केले.

त्याचे हिंदी सिनेमातील परिचित नाव इरफानखान. त्याने ब्रिटिश व अमेरिकन चित्रपटसृष्टीत काम केले. इरफानखान संवेदनशील हाडाचा कलाकार म्हणून परिचित होता. त्याच्या 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने आपला स्वतःचा एक ठसा निर्माण केला होता. इरफान यास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एशियन चित्रपट पुरस्कार व फिल्म फेअर हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराचा तो मानकरी ठरला.

1988 साली सलाम बॉम्बे या चित्रपटातून त्याचा हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश झाला. बरीच वर्षे ब्रेक मिळण्यासाठी त्याला झगडावे लागले होते. 2001 साली द वॉरिअर या ब्रिटिश चित्रपटातून तो नावारूपास आला. हासील व मुकाबला या थिएटरवरील कामामुळे त्याचे नाव झाले. लाईफ इन मेट्रो,

पान सिंग तोमर या चित्रपटामुळे त्याच्या अभिनयाचा बोलबाला वाढला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात त्याची बेस्ट अ‍ॅॅक्टर म्हणून निवड झाली.

लंच बॉक्स, पिकू, तलवार या चित्रपटातील सहायक कलाकाराच्या भूमिकेट तो गाजला. द अमेझिंग स्पायडर मॅन, लाईफ ऑफ पी, जुरासिक वर्ल्ड, इन्फेर्नो, स्लमडॉग मिलेेनिअर,न्यूयॉर्क, गुंडे आदी चित्रपटांत काम केले. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ‘हिंदी मेडियम अंग्रेजी मेडियम’ हे चित्रपट आले.

हिंदी चित्रपट सृष्टी बॉलिवूडबरोबरच त्याचे हॉलिवूड चित्रपटांतही मोठे नाव होते, ते इंग्रजी अस्खलित सहजपणे बोलत असे. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. त्याचा खर्जातील आवाज, संवाद फेक व त्याबरोबरच अभिनयाची जाण असल्याने त्यांचे फॅन जगभर आहेत.

2018 साली इरफान खान यांना मेंदूत गाठ झाली, ही गाठ कर्करोगाची होती; परंतु ती मेंदूत असल्यामुळे त्याची शस्रक्रिया होऊ शकत नव्हती. कर्करोगाच्या उपचाराने ती कमी झाली नाही. जगातल्या या असाध्य रोगामुळे 29 एप्रिल 2020 रोजी त्याच्या जीवनाचा अंत झाला.

santosh

1 नंबरच्या बाणाने दाखविलेल्या भाग्यरेषेचा उगम आयुष्यरेषेतून होत आहे, असे लोक भाग्यवान असतात. यांच्या प्रयत्नाला लवकर यश प्राप्त होते. अभिनेता इरफान 53 वर्षे जगला. आताच्या दृष्टीने तो अल्पायू होता; परंतु त्याने एक अभिनेता म्हणून आपला ठसा चित्रपटसृष्टीत निर्माण केला. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पुरस्कार व मानसन्मान मिळविले, पैसे कमवला.

2 नंबरच्या बाणाने दाखविलेली रेषा मंगळ व शुक्र ग्रहाला विभाजीत करते. त्यामुळे इरफानच्या स्वभावात कायम द्विधा मनःस्थिती असणार. एक आक्रमक, काळजीची व दुसरी रोमँटिक.

3 नंबरच्या बाणाने दाखविलेली एक स्वतंत्र भाग्यरेषा आहे. ही वयाच्या 32 वर्षे ते 52 वर्षांपर्यंत आहे. या काळात इरफान याचा भाग्योदय झाला. भरपूर कमाई त्याने केली.

4 नंबरची रवी रेषा करंगळीच्या पेर्‍यात गेल्यामुळे त्या रवी रेषेने इरफानला आंतर- राष्ट्रीय किर्ती व मानसन्मान दिले.

5 नंबरच्या विवाहरेषेने वैवाहिक सुख उशिराने दिले पण ते अतिशय उत्तम दिले.

6 नंबरच्या बाणाने दाखविलेली मस्तकरेषा आहे. ही रेषा चंद्र ग्रहावर खाली आल्यामुळे अभिनय कोशल्य, कला, भावना अविष्कार दिले व ते एक अभिनेता म्हणून सर्व गुण कामास आले.

santosh

इरफानखानच्या अकाली मृत्यूच्या कुठल्याही खाणाखुणा हातावर नाहीत. यासाठी मी सोबत एका हाताचा फोटो दिला आहे. या व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला आहे. रक्तदोष निर्माण झाल्यानंतर हातावर निळ्या काळ्या रंगाचे धब्बे येतात. इरफानच्या हाताचा फोटो हा त्याला मेंदूत गाठ निर्माण होण्याआधीचा असल्याने त्याच्या हातावर कुठलाही काळा निळा धब्बा दिसून येत नाही. असाध्य रोगाच्या लक्षणात खूप आधीच तळहातावर रक्तदोषाच्या खुणा दिसून येतात.

त्यातच रक्तदोष असेल तर, तळहातावर काळे निळे चट्टे दिसून येतात. एड्ससारखा आजार असो अथवा रक्ताचा कर्करोग, ज्याला आपण ब्लड कॅन्सर म्हणतो या आजारात सुद्धा तळहातावर निळया व काळ्या रंगाचे धब्बे-चट्टे दिसून येतात. छोटे व फिकट चट्टे असतील तर ती रोगाची सुरुवात असते. चट्टे जेवढे मोठे तेवढा तो रोग तुमच्या शरीरात पूर्णपणे रक्तात भिनलेला असतो. ज्या मंडळींचा तळहात गुलाबी हलक्या रंगाचा असतो, त्यांची प्रकृती उत्तम असते, रक्ताभिसरण सुद्धा योग्य असते. हातावरील पिवळ्या रंगाची आभा असेल तर अ‍ॅॅसिडिटीचा त्रास असू शकतो. सोबतच्या दिलेल्या फोटोत निळे काळे चट्टे आहेत. ते बाणाने दाखविले आहेत. या महिलेला गेल्या तीन महिन्यांत ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.

इरफानला कर्करोगाची गाठ होती. ती मेंदूमध्ये असल्याने तिची शस्रक्रिया करणे शक्य नव्हते, शिवाय जगामध्ये अशी शस्रक्रिया करण्याचे तंत्र अजून तरी विकसित झालेले नाही. त्यावर उपचारही नाहीत, त्यामुळे इरफानचा अकाली मृत्यू झाला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com