Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधजप कोणत्या माळेवर कराल

जप कोणत्या माळेवर कराल

हिंदू धर्मात मंत्रोपासनेला विशेष महत्त्व आहे. भगवंताचं प्रत्येक नाम जातकाला अडचणीतून बाहेर काढते, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. नामजप करणं महत्त्वाचं असल्याचं साधू-संत देखील कायम सांगतात. माळेवर जप केल्यानं अपेक्षित फलप्राप्ती आणि समाधान मिळत असल्याचं सांगितलं जातं. पण अनेकांना माळेवर नामजप कसा करावा? याबाबत माहिती नसते. ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्र असतात आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात. त्याची संख्या 108 इतकी होते. नामजप माळेवर करताना त्यात 108 मणी असणं आवश्यक आहे. तसेच एक मेरूमणी असतो. जप करताना मेरूमणी ओलांडायचा नसतो. जप मेरूमणीपर्यंत पोहोचला की, माळ उलटी फिरवून पुन्हा जपाला सुरुवात करायची असते.

* रुद्राक्ष (Rudraksha) : शंकराची उपसना करणार्‍यांनी रुद्राक्ष माळेवर जप करावा. या माळेवर जप करणं फलदायी ठरतं. ओम नम: शिवाय आणि महामृत्यूंजय मंत्राचा जप रुद्राक्ष माळेवर करावा. महामृंत्यूजय मंत्रा जप रुद्राक्ष माळेवर केल्यानं सुख-शांती आणि उत्तम आरोग्य लाभतं. रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण केल्यानंतर हृदय आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

* स्फटिक (Crystal) : या माळेवर देवी भगवतीची मंत्रोपसना केली जाते. या माळेवर नाम जप केल्यास शुभ परिणाम मिळतात. शुक्र ग्रहाचा कृपा प्रसाद मिळावा म्हणूनही ही माळ वापरली जाते.

- Advertisement -

* लाल चंदन ( Red Sandalwood) : या माळेवर देवी दुर्गेचा जप केला जातो. लाल चंदनाची माळ सकारात्मकता प्रदान करते. या माळेवर जप केल्याने देवी शीघ्र प्रसन्न होते आणि आर्थिक कोंडीतून सुटका होते. मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी मंगळाचा या माळेवर जप करावा.

* काळी हळद (Black Turmeric) : या माळेवर देवी कालिकेची मंत्रोपसना करावी. काळ्या हळदीला हिंदू धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. काळ्या हळदीत देवी लक्ष्मीचा वास असतो.

* पिवळी हळद (Yellow turmeric) : या माळेवर महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडोबाचा जप करावा. त्याचबरोबर बगलामुखी देवीची मंत्रोपसाना केल्यास चांगलं फळ मिळतं. या व्यतिरिक्त देवगुरु बृहस्पतींना प्रसन्न करण्यासाठी या माळेचा वापर केला जाऊ शकतो.

* तुळस (Basil) : वारकरी संप्रदायात तुळसी माळेचं विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी, राम, हनुमान आणि भगवान विष्णूंचं या माळेवर जप केला जातो. हरे कृष्णा हरे रामा या मंत्राचा देखील जाप करू शकता.

* मोती (pearl) : या माळेवर मनाचा कारक असलेल्या चंद्राची मंत्रोपसाना करू शकतो. मोती चंद्राचं प्रतिक म्हणून धरलं जातं. या माळेवर जप केल्यानं मनशांती लाभते.

* माणिक (Ruby) : या माळेवर ग्रहांचा राजा सूर्यदेव यांची उपासना करता येते. माणिकची माळ मिळाली नाही तर लाल चंदनाच्या माळेवरही जप करता येईल.

* मुंगा आणि पन्ना (Munga and Emerald) : मुंगा हे मंगळाचं प्रतिक आहे. या माळेवर मंगळ ग्रह आणि हनुमानाची उपसना करता येते. पन्ना हा बुध ग्रहाचं प्रतिक आहे आणि या माळेवर बुध आणि गणपतीची उपासना करता येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या