गरम तव्याबद्दलचे हे माहीत असायला हवे?

गरम तव्याबद्दलचे हे माहीत असायला हवे?

प्रत्येकाचं घर हे त्याचं स्वप्न असतं. या घरात कायम लक्ष्मीचा वास असावा, असं प्रत्येकाला वाटतं. शिवाय घर म्हणजेच आपली वास्तूमध्ये कायम आनंदी वातावरण आणि सकारात्मक वातावरण राहावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र काही केल्या घरात कलेश, वादावादी किंवा आर्थिक संकट येतं असेल तर आपण वास्तूशास्त्राची मदत घेतो. जर तुमच्याही घरात असं होतं असेल तर याचा अर्थ तुमचं काही तरी चुकतंय...

जसं म्हटलं जातं की पहिली चपाती गायीसाठी आणि दुसरी पोळी श्वानासाठी करावी असं शास्त्रात सांगितलं आहे. तसंच या पोळीच्या तव्याबद्दलही वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. प्रत्येक भारतीय घराच्या स्वयंपाकघरात पोळी बनवण्याचा तवा असतो. याला काही जन पॅन देखील म्हणतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की वास्तुशास्त्रानुसार तव्याचे असे काही नियम आहे, जे आपण करू नये असे म्हटले जाते.

तव्यावर पाणी टाकू नये - आपण आपल्या आईला किंवा घरातील मोठ्या माणसांना हे सांगताना ऐकलं असेल की, तव्यावर पाणी टाकू नये. परंतु ते असं का सांगतात? यामागचं कारण आपल्याला माहीत नसतं. परंतु वास्तुशास्त्रात याला महत्त्व आहे. आता वास्तुशास्त्र याबाबत काय सांगतं? जाणून घेऊ या.

गरम तव्यावर पाणी का टाकू नये?

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना ही सवय असते, तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात. खरंतर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागतं, जे बर्‍याच लोकांना पाहायला खूप आवडतं. ज्यामुळे ते तव्यावरती पाणी टाकतात.

परंतु वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज तयार होतो, तो आवाज घरात नकारात्मकता आणतो, यामुळे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवू शकतो.

गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो, असेही मानले जाते. असा पाऊस विध्वंस घडवून आणतो, म्हणून वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देतात.

पाण्याचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते. त्यामुळे मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, पॅन नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा, जिथून बाहेरच्या व्यक्तीला ते दिसले नाही पाहिजे.

तवा नेहमी खाली आडवा ठेवावा.

तवा वापरल्यानंतर नेहमी स्वच्छ ठेवा. नाहीतर घरात गरीबी निर्माण होते.

जेव्हा तुम्ही पोळी बनवायला सुरुवात कराल, तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मीठामुळे तवा जंतूमुक्त होतो आणि त्यावर बनवलेल्या चपाती खाल्ल्याने आजार होत नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com