नरेंद्र मोदी : प्रभावाला धक्का, यश कायम

नरेंद्र मोदी : प्रभावाला धक्का, यश कायम

भारतीय राजकारणात आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण असा प्रश्न सत्ताधारी पक्षाकडून वारंवार विचारला जातो. स्थितीही काहीशी तशीच आहे. पण कुंडलीत काही मानसिक त्रास आणि यशातील चढ-उतार दिसतात.

17 सप्टेंबर 1950 ही त्यांची जन्मतारीख. जन्मवेळ अकराची तर ठिकाण मेहसाना. वृश्चिक ही त्यांची जन्मराशी आणि जन्म नक्षत्र अनुराधा.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत देशात हाहाकार माजला. या काळात पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र जनतेचे हाल झाले, असा आरोप विरोधक करतात. या काळात देत अभुतपूर्व संकटांना सामोरा गेला. अकल्पित घटनांचा हा कालखंड देशाने पाहिले. यावरून केंद्रातील सरकारला आणि प्रमुख म्हणून मोदींना अनेक आक्षेप-आरोपांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेच्या आलेखाला याच काळाने धक्का दिला.

मोदी यांच्या पत्रिकेत 28 सप्टेंबर 1998 ते 27 सप्टेंबर 2028 हा कालखंड उत्तम यशाचा होय. आपण या कालखंडातील त्यांचे यश पाहतच आहोत. मात्र याच कालखंडात त्यांना अनेक मानसिक त्रास सहन करावा लागणार आणि तो उत्तरोत्तर वाढणार, असे संकेतही कुंडलीत आहेत. भाग्येश निचस्थ चंद्राची महादशा 27 नोव्हेंबर 2021 ला संपणार असल्याने मानसिक त्रासाचे प्रमाण त्यानंतर बर्‍यापैकी कमी होण्याचे योग आहेत. याचा अर्थ पंतप्रधान म्हणून करोना संकटकाळातील त्यांना झालेला मासनिक त्रास हा सर्वोच्च असावा, असा अर्थ काढता येतो. या वर्षाअखेर ते या मानसिक त्रासातून बाहेर पडतील, याचा दुसरा अर्थ तोवर देशाही करोनातून सावरलेला असेल, असे संकेत मिळतात.

2024 च्या लोकसभेचा विचार करता मंगळाच्या महादशेत 19 एप्रिल 2024 पर्यंत गुरुची तर त्यानंतर शनीची अंतर्दशा असून हे पत्रिकेत केंद्रस्थानी असल्याने यशदायी ठरणार आहे. म्हणजेच ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि निकालाच्या काळात यशाचे नवे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होत असल्याचे दिसतात. पुढे 27 नोव्हेंबर 2028 पर्यंत सत्तेवरील त्यांची पकड आणि यशाचे प्रमाण कमी जास्त होण्याचे संकेत असले तरी स्थिती कायम राहण्याचे योग आहेत. मात्र पत्रिकांचा अभ्यास करता, त्यांना देशातील दोन नेत्यांच्या पत्रिकेतील संयोग आव्हान देण्याचे संकेत देतात. ते आपण पुढे पाहु !

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com