मनी प्लांट लावण्यापूर्वी

मनी प्लांट लावण्यापूर्वी

असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धीसह पैशाची आवक वाढते. यामुळे लोक हा प्लांट आपल्या घरात लावतात. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात योग्य दिशेला नसल्यास आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं.

1. वास्तुशास्त्राप्रमाणे घरात मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वात योग्य दिशा आहे. या दिशेला वेल लावल्यास सकारात्मक उर्जेचा लाभही होतो.

2. मनी प्लांटला आग्नेय अर्थात दक्षिण-पूर्व दिशेत लावण्यामागील कारण म्हणजे या दिशेचं दैवत गणपती आहे आणि प्रतिनिधी शुक्र आहे.

3. गणपती वाईटाचा नाश करणारा आहे, तर शुक्र सुख आणि समृद्धी प्रदान करणारा. एवढेच नाही तर वेल व लतांचे कारण शुक्र ग्रह मानले जाते. म्हणून, मनी प्लांटला आग्नेय दिशेने ठेवणे योग्य मानले जाते.

4. मनी प्लांट चुकुनही ईशान अर्थात उत्तर-पूर्व दिशेला लावू नये.

5. ही दिशा यासाठी सर्वात नकारात्मक असल्याचे मानले जाते कारण ईशान दिशेचा प्रतिनिधी देवगुरु बृहस्पति मानला गेला आहे आणि शुक्र व बृहस्पति यांच्यात वैमनस्यपूर्ण संबंध आहे. म्हणून शुक्राशी निगडित हा वेल ईशान दिशेत असल्यास नुकसान करतं. या दिशेला तुळशीचं रोप लावू शकता.

6. असे म्हणतात की मनी प्लांटची जमिनीला स्पर्श करणारी पाने आनंद आणि समृद्धीला अडथळा आणतात आणि यशामध्ये अडथळा देखील असतो. जर अशी स्थिती असेल तर वेलाला आधार देत वरील बाजूस उचलावे.

7. मनी प्लांटची पाने सुकल्यास त्यांना त्वरित काढा. चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनी प्लांटमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणजेच आपल्याला धन हानि देखील होऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com