आक्रमक राऊतांना मंगळाचा आधार

भविष्य आपल्या हाती
आक्रमक राऊतांना मंगळाचा आधार

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबाग येथे झाला. राजाराम राऊत व सविता राजाराम राऊत यांचे ते सुपूत्र. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम.चे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 16 फेब्रुवारी 1993 रोजी त्यांचे वर्षा राऊत यांच्याशी लग्न झाले. त्यांनी 2004 च्या राज्यसभा निवडणुकीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2005 मध्ये ते शिवसेना पक्षाचे नेते आणि आवाज बनले. त्यांनी ऑक्टोबर 2005 ते मे 2009 मध्ये नागरी उड्डयन मंत्रालयाच्या गृह व्यवहार आणि सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. 2010 मध्ये, राज्यसभा निवडणूक 2010 मध्ये पुन्हा निवडून आले. 2010-2016 पासून त्यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या अन्न ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. 2016 मध्ये ते राज्यसभा निवडणूक 2016 साठी पुन्हा निवडून आले. संजय राऊत हे पत्रकार आणि लेखकही आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

बंधन योग हा नशिबातच असतो. बंधन योग म्हणजे जेव्हा तुमच्या स्वातंत्र्यावर गदा व तुम्हाला एका खोलीत बंदी राहण्याची दिलेली शिक्षा भोगावी लागते. नियम अटींचे पालन करावे लागते. दिलेले काम करावे लागते. आहे ते अन्न खावे लागते. हस्तसामुद्रिकशास्त्रात तुरुंगवास होणार असेल तर तो किती तरी वर्ष आधी सांगता येतो. त्याचे भाकीत करता येते. तुरुंगवास होणार हे सांगता येत असल्याने तो तुम्ही केलेल्या गुन्ह्यात अथवा तुम्ही अडकलेल्या गुन्ह्यात तुमचा सहभाग असेल त्यानुसार असतो. गुन्ह्यात फौजदारी केस दाखल होणार असेल तर हातावर स्पष्टपणे संकेत मिळतात. थोडक्यात बंधन योग असतील तर तुरुंगवासाच्या खाणाखुणा डाव्या व उजव्या हातावर पाहावयास मिळतात.

डावा व उजवा हात - डावा हात हा पूर्व जन्मीच्या संचिताचा व उजवा हात हा कर्माचा असतो. डाव्या हातावर तुरुंगवास लिहिलेला असेल तर त्यातून सुटका परमेश्वरच करू शकतो. कारण डाव्या हातावरच्या रेषा चिन्हे सहसा बदलत नाहीत. संचिताचा डावा हात पूर्व जन्मीच्या पाप पुण्याचा मानला गेला आहे. अर्थात त्यात पितृ- मातृ दोषही असतात. हस्तरेषेवरून भविष्य कथन करताना डाव्या हातावरील रेषा, ग्रह चिन्ह, यांचे शुभ अशुभ आधी बघावे लागते. मग ती स्त्री असो वा पुरुष. डावा हात हा संचिताचा असतो व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या पाप पुण्याचा लेखा जोखा डाव्या हातावर असतो. उजव्या हातावर कर्म असते. मनुष्यला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. व्यक्तीने निरंतर व प्रयत्नपूर्वक काम केले किंवा निर्धाराने, कष्टाने, जिद्दीने जीवनातं यशस्वी होण्याचे ठरले तर त्याचे भाग्य बदलते. एवढेच नव्हे तर जेव्हा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा ध्यास घेते व कार्य सफल करण्याचा प्रयत्न करते तेव्हा उजव्या हातावरील रेषा सुद्धा शुभदायी आकार घेतात किंवा नव्याने हातावर येतात. याचाच अर्थ असा आहे कि उजव्या म्हणजे कर्माच्या हातातील भाग्य बदलण्याचे सामर्थ्य मनुष्याला परमेश्वराने बहाल केले आहे. ते बदलण्याचे सामर्थ्य तुमच्यात हवे व त्यासाठी तुमचा निश्चय हा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे म्हणजेच कर्म पण भिन्न आहे. प्रत्येकाच्या कर्मात सुख दुःख वेगळे आहे. त्याला जीवनात मिळणार्‍या सुखसोयी व संधी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे नशीब वेगळे आहे. कोणी रस्त्यावर झोपडीत तर कोणी महालात जन्म घेतो, हे सर्व तुमच्या पूर्व जन्मीच्या संचितानुसार घडत असते. जीवन जगताना कर्मात होणार्‍या चुकांचे प्रायश्चित्त भोगावे लागते म्हणजेच उजव्या हातावरील शुभ अशुभ लक्षणे व्यक्तीच्या जीवनात परिणाम घडवून आणतात. हस्तसामुद्रिक असे एकमेव शास्त्र आहे कि ते कित्येक वर्ष आधी शुभ योग अथवा कुयोग यांचे भाकीत करू शकते.

उजव्या हातावरील चौकोन चिन्ह - स्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हातावरील चौकोन चिन्ह हे शुभ चिन्ह म्हणून मानले गेले आहे. परंतु आयुष्य रेषेच्या आत स्वतंत्रपणे चौकोन चिन्ह झाले असेल तर ते तुरुंगवास किंवा फौजदारी खटला दाखविते. चौकोन चिन्हाची सुरुवात आयुष्य रेषेच्या आत ज्या वय वर्षात असेल त्या वय वर्षात गुन्हाच्यादृष्टीने त्या व्यक्तीच्या हातून कळत नकळत चुका घडतात किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुन्ह्याशी संबंध येतो. चौकोनाच्या सुरुवातीपासून तुरुंगवासाच्या शिक्षेची टांगती तलवार असते. संजय राऊत यांच्या हातावर आयुष्य रेषेच्या आत वय वर्ष 35 ते 42 च्या दरम्यान चौकोन चिन्ह आहे. खटल्याची पार्श्वभूमी या वय वर्षात झाली असणार. संजय राऊत यांना अटक मात्र वय वर्षे 61 ला झाली. काही कारणाने बंधन योग किंवा तुरुंगवास हा चौकोन असलेल्या वय वर्षात झाला नाही तरी चौकोन चिन्हाच्या वयानंतर सुद्धा त्याचा प्रभाव कायम राहतो. याचाच अर्थ चौकोन चिन्ह हे तुरुंगवासाची टांगती तलवार आहे. आयुष्य रेषेच्या आत स्वतंत्र चौकोन चिन्ह तयार झालेले असेल तर तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात बंधन योग निश्चित असतोेेच. संजय राऊत यांना त्यांच्या आयुष्य रेषेच्या आत असलेल्या चौकोनाच्या वयात बंधन योग का झाला नाही, याचे उत्तर सर्वांना ज्ञात आहे. ज्या वेळेस संजय राऊत सत्तेवर होते किंवा युती सरकार होते त्या काळात सरकारी राजदंड संजय राऊत यांच्या विरोधात जाणे शक्य नव्हते. सरकार बदलले, संजय राऊत सत्तेत राहिले नाही आणि त्याच वेळेस राजदंड विरोधात गेला. त्यांना अटक झाली व तीन महिने ते तुरुंगात होते. सोबतच्या आकृतीत आयुष्य रेषेचा आत चौकोन आहे. ते तुरुंवासाचे नव्हे तर आयुष्यातील वाद व कटकटीचे असतात.

आयुष्य रेषेच्या आत मंगळ रेषेच्या साह्याने अंगठ्याकडून अथवा शुक्र ग्रहावरून आडव्या रेषा आयुष्य रेषेपर्यंत येऊन थांबत असतील किंवा त्या आयुष्य रेषेला छेदल्याने बरेचसे चौकोन दिसत असतील तर हे चौकोन तुरुंगवासाचे चिन्ह नव्हे. बरेचसे चौकोन चिन्ह आयुष्य रेषेला लांब पर्यंत आयुष्य रेषेच्या आत आहेत तोपर्यंत त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कलह किंवा कटकटी संपुष्टात येत नाहीत. या काळात कटकटी कायम राहतात. व्यावसायिक, भागीदारी,कौटुंबिक,कोर्ट कचेर्‍यातील किंवा आपापसातील भांडणे व तंटे संपत नाहीत. थोडक्यात आयुष्य रेषेच्या आत उभ्या व आडव्या रेषेमुळे बरेचसे चौकोन तयार झाले असतील तर ते कोणत्याही स्वरूपाचे कटकटीचे व वादांचे असू शकतात कि जे वर्षानुवर्ष मिटत नाहीत.

संजय राऊत यांना ईडीच्या खटल्यात शिक्षा संभव नाही.

संजय राऊत सध्या जामिनावर सुटले आहेत, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार किंवा उपलब्ध पुराव्यानुसार त्यांची अटक बेकायदेशीर आहे, त्यामुळे संजय राऊत यांना ईडीच्या खटल्यात उच्च न्यायालयात शिक्षा होण्याचा संभव नाही. परंतु संजय राऊत यांना इतर फौजदारी खटल्यांचा सामना करावा लागू शकतो व त्यात त्यांना आर्थिक किंवा बंधन योगाची शिक्षा होऊ शकते. संजय राऊत यांच्या हातावर चंद्र ग्रहावरून एक आडवी रेषा आयुष्य रेषा छेदून शुक्र ग्रहावर गेली आहे, ही रेषा विरुद्ध लिंगी व्यक्तीने केलेल्या आरोपा संदर्भात आहे, त्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीने दाखल केलेल्या खटल्यात राऊत यांना त्रास होऊ शकतो, किंवा खटल्याला सामोरे जावे लागू शकते.

हृदय विकाराचा त्रास - संजय राऊत यांची हृदय रेषा वय वर्षे 65 नंतर अत्यंत नाजूक झालेली आहे व त्यांना हृदयरोगासंबंधी अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या राऊत हे 61 वर्षार्ंचे आहेत व 15 नोव्हेंबर रोजी ते 62 व्या वर्षात पदार्पण करतील. त्यामुळे नजीकच्या काळात त्यांना त्यांच्या मनःस्थितीची अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. संजय राऊत यांचा खालचा मंगळ बलवान आहे. खालचा मंगळ ग्रह जो अंगठ्याच्याजवळ व आयुष्य रेषेच्या आत असतो त्या मंगळ ग्रहाने मोठा उभार घेतल्याने राऊत हे निधड्या छातीचे व आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. हृदय रेषा व मस्तक रेषेतील अंगठ्याच्या विरुद्ध बाजूस स्थित मंगळ हा मोठा व उत्तम आहे, हा वरचा मंगळ विचारी मंगळ आहे व युक्तीने, बुद्धी चातुर्याने शत्रूवर मात करण्याची या मंगळात ताकद आहे. या वरच्या मंगळ ग्रहावर शत्रूस्थानी असलेल्या आडव्या रेषा आहेत. त्यात एक अत्यंत ठळक व जाड आहे. वरच्या मंगळ ग्रहावर हाताच्या बाहेरून आत आलेल्या मस्तक रेषा व हृदय रेषेमध्ये असलेल्या आडव्या रेषा या शत्रू रेषा असतात. पातळ पुसट आडव्या शत्रू रेषा फारसा अडथळा आणत नाहीत, परंतु ठळक आडवी लांब रेषा मोठ्या शत्रूचे प्रतिनिधित्व करते. संजय राऊत नशीबवान आहेत. भाग्य रेषेतून रवी रेषेचा उगम व रवी रेषेतून बुध रेषेचा उगम असल्याने, बुध व रवि ग्रह शुभदायी झाले आहेत. या रवि व बुधाच्या युतीमुळे संजय राऊत यांच्या लेखणीला धार आली आहे, बुध ग्रहाने हुशारी व चलाखी प्रदान केली आहे, रवि ग्रहाने मान सन्मान व कीर्ती दिली आहे. लोकशाहीत विरोधक हा नेहमी कणखर असावा लागतो त्याशिवाय राज्यकर्त्यांवर अंकुश राहत नाही. संजय राऊत यांच्यासारख्या आवाज उठवणार्‍या नेत्याची जनतेला गरज आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com