Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधविवाह रेषा हातावर नसेल तर, लग्न करू नये !

विवाह रेषा हातावर नसेल तर, लग्न करू नये !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

बुध उंचवट्यावरून आत आलेली सर्वसाधारण एक ते दोन सेंटीमीटर लांबीची छोटी रेषा म्हणजे विवाह रेषा होय. विवाह रेषा हातावर एक, दोन किंवा तीनही संख्येेने असतात. किंवा ती अतिशय छोटी असू शकते. छोट्या मोठ्या दोन तीनही असू शकतात.

- Advertisement -

विवाह रेषा ही स्त्री पुरूषाच्या मिलनाची रेषा होय. ज्यांचा विवाह झाला नाही अशा लोकाच्या हातावरही विवाह रेषा असते. ज्यांनी आजन्म विवाह केला नाही अशा लोकांच्या हातावरही विवाह रेषा सापडते.

विवाह रेषा लैंगिक मिलनाची सूचक आहे. तसेच स्त्री पुरूष कौटुंबिक जीवनात किती सुखी आहे, अथवा दुःखी आहे. किंवा एकमेकांत किती कौटुंबिक सुख आहे, ते साधारण उत्तम, अतिउत्तम कोणत्या सदरात मोडते हे या रेषेवरून समजते.

विवाह रेषा करंगळीच्या तिसर्‍या पेर्‍या खाली बुध ग्रहावर हाताच्या बाहेरून आत आलेली एक ते दीड सेंटिमीटरची रेषा ही विवाह रेषा होय. विवाह रेषा दोनही हातावर करंगळीच्या खाली असते, ही विवाह रेषा एक ते तीन संख्येने हातावर असू शकते.

नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या हातावर विवाह रेषा पाहावयास मिळते, विवाह रेषा उत्तम असेल तर वैवाहिक सौख्य उत्तम लाभणार हे हस्त सामुद्रिक शास्त्री रेषा पाहून कोणत्याही वयात भविष्य वर्तवू शकतात.

विवाह रेषा बारीक चमकदार व सरळ रेषेत असेल तर ती वैवाहिक सौख्य भरभरून देते. विवाह रेषा थोडी वाकडी, जाड – पसरट, दुभंगलेली ,दुसर्‍या रेषेनी छेदलेली, हातावरील इतर रेषां पेक्षा काळपट तपकिरी रंगाची, खूपच छोटी पुसट असेल तर वैवाहिक सौख्य कमी देते.विवाह रेषा हातावर दोन असता दोन विवाहाचे योग येत नाहीत.

विवाह रेषा करंगळीच्या जवळ छोटीशी, विवाह योग उशिरा व विवाहाची घाई नाही.

विवाह रेषा जाड – पसरट, असेल तर वैवाहिक सौख्य कमी देते.

विवाह रेषा दुभंगलेली असेल तर पती-पत्नी मध्ये मतभेद असतात

विवाह रेषा बाक घेऊन शेवटी वाकडी झाली असेल तर पती-पत्नी मध्ये कायमचे मतभेद असतात.

फोटोत दाखविलेल्या प्रमाणे तीन चार विवाह रेषा असतील तर विवाह उपरांत विवाह बाह्य संबंधाचे योग असतात. मुख्य विवाह रेषेच्या अलिकडे स्वतंत्र विवाह रेषेचा तुकडा असेल तर लग्नाआधीचे संबंध दाखविते व मुख्य विवाह रेषेनंतर अजून एक स्वतंत्र बारीक रेषा तुटकपणे हातावर असेल तर लग्नानंतरचे विवाह बाह्य संबंध दाखविते.

येथे एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी कि ज्यांच्या हातावर गुरु ग्रह उत्तम असेल तर असे लोक त्यांना संधी येऊन सुद्धा त्या संधीस बळी पडत नाहीत किंवा त्यांचे विवाह बाह्य संबंध ठेवण्याचे धारिष्ट्य होत नाही, अथवा उत्तम संस्कार, सुसंस्कृतपणा त्यांना मोहापासून दूर ठेवतो.

विवाह रेषा हातावर नसेल तर, अश्या स्त्री अथवा पुरुषाने लग्न करू नये ! यांच्यात स्त्री आणि पुरुषातील नैसर्गिक आकर्षण नसते,यांना अपत्य प्राप्ती होऊच शकत नाही, हस्त सामुद्रिक शास्त्रात विवाह रेषा स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाची रेषा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या