प्रभूची अनेक रूपे

प्रभूची अनेक रूपे
गुरू संत राजिंदर सिंह जी महाराजGuru Rajinder Singh Ji Maharaj

जीवन आपल्याला दररोज इतरांची मदत करण्याची संधी देते. आपण लक्षात घ्यावे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. सर्व प्रभूचे अंश आहेत. जेंव्हा आपण कोणाला हिणवतो तेंव्हा आपण प्रभूच्या मुलाला हिणवत असतो. असे वागल्यास प्रभू आपल्यावर कसा बरं प्रसन्न होईल? जेंव्हा की, प्रभूच्या एका सुद्धा संतानाची आपण मदत करीत नाही. आपल्याला कधी माहीत नसते की प्रभु कोणत्या रूपात आपल्याजवळ येतील. काही लोक फक्त प्रत्यक्षातच परमात्म्याची सेवा करू इच्छितात. आपल्याला हे समजत नाही की, परमात्म्याच्या सृष्टीची सेवा सुद्धा प्रभूची सेवा आहे.

संत-सद्गुरू निष्काम सेवेचे मूर्तरूप असतात. ते आपले जीवन इतरां करता अर्पण करतात. सातत्याने ते आपले काम-काज सोडून इतरांची मदत करण्यात सक्रिय असतात. ते आपल्या समाजाचे सक्रिय सदस्य असतात व जे कोणी त्यांच्याकडे येतात ते त्यांची मदत करतात.

इतरांची मदत करण्यापासून परावृत्त होणे हे अध्यात्म नाही. याचा अर्थ असा की दुसर्‍यांच्या गरजा समजून घेणे, त्यांच्या प्रती संवेदनशील असणे. जसे की महान सुफी शायर संत दर्शन सिंहजी महाराज म्हणतात -

जुस्तजू चांद सितारों की तो जारी है मगर

आज इंसा को कहा है दिले-इंसा की खबर

जेंव्हा आपण ध्यान-अभ्यासाद्वारा अध्यात्मिक रुपाने विकसित होण्यासाठी प्रयत्नशील असू, तेंव्हा आपण उदात्त मनाचे ह्या संपूर्ण सृष्टीला एकच परिवार मानून सर्वाना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला समजून येईल की आपण इतरांची निरपेक्ष अंतकरणाने सेवा करीत आहोत. जेंव्हा आपण असे करू, तेंव्हा आपणास असे लक्षात येईल कि, आपण खरोखरच प्रभूची प्रसन्नता प्राप्त करून घेत आहोत.

- संत राजिंदर सिंह जी महाराज

Related Stories

No stories found.