ममता बॅनर्जी - संघर्षाचा काळ

ममता बॅनर्जी - संघर्षाचा काळ

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील सत्तेला कोणीही, कितीही प्रयत्न केला तरी धक्का लावू शकत नाही असे भविष्य आम्ही 2 वर्षापूर्वी वर्तविले होते. नुकतेच तसे घडले. त्या पुन्हा मुख्ममंत्री म्हणून विराजमान झाल्या आहेत.

3 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांना सत्ता आणि पद अबाधित राखण्यासाठी अनेक संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र 2024 नंतर अचानक त्यांची राजकीय ग्रहस्थिती अनुकूल होत आहे.

म्हणजेच 2024 पर्यंत विद्यमान केंद्रीय सत्तेशी संघर्ष आणि 2024 नंतर केंद्रात मित्रच सत्तेत असे याचे संकेत मानता येतील. सध्या त्या भाजपशी एकट्याने दोन हात करताना दिसतात, हे विशेष.

5 नोव्हेंबर 1955 रोजी त्यांचा 12 वाजता कोलकाता येथे जन्म झाला. जन्म राशी वृषभ तर नक्षत्र कृतिका-3. त्यांच्या पत्रिकेत 17 जुलै 2026 पर्यंत शनिची महादशा आहे. वर्गोत्तम मेष लग्न वृषभ राशि मुळे चिकाटी व कष्ट करण्याची सतत तयारी असली तरीही कोणाचेही अधिपत्य मान्य नसणे, आरे ला कारे करणे, टोकाचे संतापणे तसेच सर्वांना तडजोडीने सामावून घेण जमत नाही.

मात्र 17 ऑगस्ट 2026 पर्यंत ग्रहस्थिती उत्तम असल्याने सध्या मानसिक त्रासापेक्षा वेगळे काही राजकीय नुकसान होण्याचे योग नाहीत. 2024 च्या लोकसभेचा विचार करता त्यांना स्वतःला जरी सर्वोच्च पदावर जाता आले नाही, तरी अन्य नेत्याला त्या पदावर पोहचविण्याचे योग त्यांना आहेत.

मात्र त्यासाठी राग, लोभ बाजूला ठेवावे लागतील. तरच ही महत्त्वाची भूमिका त्यांच्या हातून पार पडण्याचे योग आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com