Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधमहाशिवरात्री

महाशिवरात्री

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र (Mahashivaratri) म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या (Mahashivaratri) दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण ( Agni Purana), शिव पुराण (Shiva Purana), पद्म पुराण (Padma Purana) या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.

- Advertisement -

एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग (Shivling) होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली.

पहाटे एक हरीण ( Deer) तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- मला मार पण इतराना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.

महाशिवरात्रीला (Mahashivaratri) शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर ( Shivling) लेप देतात.त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.

माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी महाशिवरात्री (Mahashivaratri) म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो.

काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना 16 सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. यादिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न (Lord Shankara) होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवारात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात, महादेव ( Mahadev) प्रसन्न होतात. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात. महादेवांनी ( Mahadev) या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

व्रत-पूजन कसे करावे या दिवशी भल्या पहाटेच स्नान-ध्यान आटोपून उपवास धरावा. फूल-पत्री तसेच सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून कलशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरी-शंकर आणि नंदीची मूर्ती ठेवावी. या मूर्ती शक्य नसतील तर माती घेऊन त्याचे शिवलिंग बनवावे. कलश पाण्याने भरून तांदूळ, पान, सुपारी, लवंग, वेलची, चंदन, दूध, दही, तूप, मध, कमलगट्टा, धोतर्‍याचे फूल, बेल, यांचा प्रसाद शंकराला अर्पण करून पूजा करावी.

रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी. महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरते. शिवआराधना स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असते. या जागरणात शिवशंकराच्या चार आरती म्हणणे गरजेचे आहे. या दिवशी शिवरात्रीची कथा सांगा किंवा ऐका. दुसर्‍या दिवशी तीळ-खीर तसेच बेलपत्रांचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे. हा विधी पवित्र भाव ठेवून केल्यास शंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या