सर्वांवर प्रेम अन् सर्वांची सेवा सत्य साईंची जगाला शिकवण

भविष्य आपल्या हाती
सर्वांवर प्रेम अन् सर्वांची सेवा सत्य साईंची जगाला शिकवण

प्रफुुुल्ल कुलकर्णी

धार्मिक श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक हक्काचा विषय आहे. भारतात जन्मलेल्या श्री सत्य साई (Sri Satya Sai) यांच्याबद्दल त्यांनी उभारलेल्या सामाजिक उन्नतीच्या कामांसाठी आदर आहे. ते स्वतः विद्वान होते. धर्म प्रसार करत असताना सामाजिक कार्यात त्यांनी त्यांचा खजिना रिता केला.त्यांचे भारतासह 120 देशात असंख्य अनुयायी आहेत. अनेक सन्मान त्यांना मिळाले ‘वसुधैव कुटुंबकम’ ची कल्पना त्यांनी देशोदेशी रुजवली. श्री सत्य साई (Sri Satya Sai) यांच्या उजव्या हाताचा अभ्यास आपण हस्तसामुद्रिकदृष्ट्या करणार आहोत.

श्री सत्य साई (Sri Satya Sai) म्हणजेच सत्य नारायण राजू यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1926 रोजी मीसरगंडा ईश्वरम्मा आणि पेद्दावेंकमा राजू रत्नाकरम यांच्या घरी चौथे अपत्य म्हणून झाला. सत्य साईंचा जन्म पुट्टापर्थी येथे झाला. त्या काळात गाव ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतात होते. लहानपणी अभ्यासात आवड कधीच नव्हती. त्यांची आध्यात्मिक प्रवृत्ती व त्यानुसार भक्ती संगीत, नृत्य आणि नाटक यामध्ये त्यांना रूची होती आणि असामान्यपणे प्रतिभावान होते. ते लहानपणापासूनच चमत्कार करत. अन्न आणि मिठाई यासारख्या वस्तू हवेतून बाहेर काढण्यात सक्षम असल्याचा त्यांच्या भक्तांचा दावा आहे. सत्य साईबाबा यांनी वयाच्या 14 व्या वर्षी शिर्डी येथील साईबाबांचा पुनर्जन्म असल्याची घोषणा केली. सत्य साई बाबा त्यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, कोणत्याही प्रसंगी दुसर्‍याला मदत करा, कधीही दुखवू नका असा होता. सत्य साई यांच्या दर्शनाचा आध्यात्मिक लाभ मिळविण्यावर अनुयायांचा विश्वास होता. दररोज सकाळ आणि दुपारच्या वेळापत्रकानुसार साईबाबा लोकांशी संवाद साधत, पत्रे स्वीकारत किंवा मुलाखतीसाठी गटानुसार संवाद साधत होते.

पुट्टापर्थी गावाजवळ साईबाबांच्या भक्तांसाठी पहिले मंदिर बांधण्यात आले. सत्य साईंनी पुट्टापर्थी गावात एक लहान मोफत सामान्य रुग्णालय स्थापन केले. या रुग्णालयात ते आपल्या गूढ शक्तींनी रोग बरे करीत असत, असा दावा केला जात असे. साईबाबांनी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त रायलसीमा प्रदेशातील एक कोटी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला व पूर्णत्वास नेला. एप्रिल 1999 मध्ये त्यांनी मदुराई, तामिळनाडू येथे आनंद निलायम मंदिराचे उद्घाटन केले. 2001 मध्ये त्यांनी गरिबांना लाभ देण्यासाठी बंगलोरमध्ये आणखी एक मोफत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. सत्य साई बाबा (Sri Satya Sai) यांचे जीवन आणि शिकवणी यांना समर्पित चैतन्य ज्योती संग्रहालय पुट्टापर्थी येथे बांधले. जिथे सत्य साई बाबांचा जन्म झाला व जेथे ते राहत होते, ते मूळ आंध्र प्रदेशातील एक लहान, दुर्गम दक्षिण भारतीय गाव होते. आता तेथे एक विस्तीर्ण विद्यापीठ संकुल, एक विशेष रुग्णालय आणि दोन संग्रहालये आहेत.

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कोनिजेती रोसैया आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांसारखे उच्चपदस्थ भारतीय राजकारणी पुट्टापर्थी येथील आश्रमात अधिकृत पाहुणे म्हणून राहिले होते. चमत्कार आणि इतर सत्यापित अंधश्रद्धेचा तर्कशुद्ध आणि वैज्ञानिकदृष्ट्या तपास करण्यासाठी एक समिती एप्रिल 1976 मध्ये स्थापन केली आणि त्याचे अध्यक्ष होसूर नरसिम्हय्या होते. ते एक भौतिकशास्त्रज्ञ, तर्कवादी आणि बंगळुरू विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू होते. नरसिंहय्या यांनी साईबाबांना नियंत्रित परिस्थितीत चमत्कार करण्याचे आव्हान देणारी तीन मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी पत्रे लिहिली. सत्य साईंनी या पत्रांकडे दुर्लक्ष केले व आव्हान स्वीकारले नाही. सत्य साई बाबा म्हणाले की, त्यांनी नरसिंहय्या यांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले कारण त्यांना वाटले की आध्यात्मिक समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टीकोन अयोग्य आहे. विज्ञानाने त्याची चौकशी फक्त मानवी इंद्रियांशी संबंधित गोष्टींपुरती मर्यादित केली पाहिजे, तर अध्यात्मवाद इंद्रियांच्या पलीकडचा आहे, असाही त्यांचा दावा होता.

आध्यात्मिक शक्तीचे स्वरूप तुम्ही केवळ अध्यात्माच्या मार्गानेच जाणू शकता, विज्ञानाने नाही. विज्ञान जे काही उलगडू शकले आहे ते केवळ वैश्विक घटनांचा एक अंश आहे, असेही त्यांचा दावा. नरसिंहय्या यांची समिती ऑगस्ट 1977 मध्ये विसर्जित करण्यात आली. सत्य साई बाबांनी आव्हान पत्रांकडे दुर्लक्ष केले हे चमत्कार फसवे असल्याचे संकेत असल्याचे नरसिंहय्या यांनी मानले. यावरून अनेक महिने सार्वजनिक वादविवाद सुरू होता. सत्य साई यांचे 24 एप्रिल रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.

सत्य साई संघटना (किंवा श्री सत्य साई सेवा संस्था) ची स्थापना सत्य साई बाबा यांनी 1960 मध्ये केली होती. सुरुवातीला संघटनेस श्री सत्य साई सेवा समिती असे संबोधले जाते होते. सदस्यांना आध्यात्मिक उन्नतीचे साधन म्हणून सेवा उपक्रम हाती घेण्यास सक्षम करण्यासाठी करण्यात या संघटनेची स्थापना झाली होती. 114 देशांमध्ये अंदाजे 1,200 सत्य साई बाबा केंद्रे आहेत. सक्रिय साईबाबा अनुयायांची संख्या अंदाजे 100 दशलक्ष आहे, असे या संघटनेचा अहवाल सांगतो.

बुध ग्रहाच्या हुशारीचा लाभ

आध्यात्मिक शक्ती किंवा श्री साईबाबांचा अवतार असल्याचा साक्षात्कार श्री सत्य साईंना त्यांच्या वयाच्या 14 व्या वर्षी झाला. त्यांना विंचूच्या दंशाने आघात केल्यानंतर ते बेशुद्ध होते. ते जेव्हा शुद्धीत आले, तेव्हा त्यांना न येणार्‍या भाषा त्यांना अवगत झाल्या व ते चमत्कार दाखवू लागले. सत्य साईंचा उजवा हात हा भाग्यशाली व संपन्न आहे. हातावर भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावते आहे, तिचा ओघ गुरु ग्रहावर गेला आहे.

भाग्य रेषा किंवा भाग्य रेषेचा एखादा फाटा गुरु ग्रहावर जाऊन थांबतो तेव्हा समाजासाठी दानधर्म त्या व्यक्तीच्या हातून होतो. त्यासाठी यथाशक्ती संपत्ती तो निश्चित अर्जित करीत असतो. हातावर अजून एक भाग्य रेषा असून ती मस्तक रेषेच्या खाली उगम पाऊन शनी ग्रहाच्या मध्यावर गेल्याने सत्य साईंची स्वअर्जित मोठी संपत्ती वयाच्या 30 व्या वर्षांपासून अखेरपर्यंत दाखविते. त्यात संपत्तीची प्रचंड वाढ सत्य साईंच्या वयाच्या 55 नंतर जोमाने झालेली आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरली आहे. चंद्र ग्रह (Lunar planet) स्वच्छ आहे. ही रेषा विविध संकेत देते. धार्मिक विचार व मंथनाच्यादृष्टीने अभ्यासपूर्ण कार्य करून घेते. शुक्र ग्रहासमोरील चंद्र ग्रह तळहातावर मध्यभागी उभार घेतलेला आहे.त्यामुळे तो विद्वत्ता तर प्रदान करतोच आहे शिवाय भविष्यातील संकेतांची अचूक जाणीव करून देतो. या मिळणार्‍या दृष्टांतामुळेच सत्य साईंच्या अनुयायांचे प्रश्न ते सहजी सोडवत होते व त्याप्रमाणे उपदेशही करीत होते. त्यांचे लाखो अनुयायी बनत होते.

मस्तक रेषा व आयुष्य रेषेत त्यांच्या उगमापाशी थोडेशे अंतर आहे. या अंतरामुळे सत्य साईंना कोणाकडून आपले काम होईल व ते कसे युक्तीने करून घेता येईल याची उपजत हुशारी व प्रवृत्ती प्राप्त झाली आहे. एक रवी रेषा आयुष्य रेषेच्या आतून म्हणजे शुक्र ग्रहावरून उगम पाऊन थेट रवी उंचवट्यावर गेली आहे. ही रेषा मानसन्मानाबरोबरच शुक्र ग्रहाच्या कारकत्वामुळे ऐश्वर्य, संपन्नता मिळाली आहे. रवी ग्रहावर असलेली आणखी एक रवी रेषा तिसर्‍या बोटाच्या पेर्‍यात गेल्याने स्वतःच्या मान सन्मानासाठी वाटेल तेवढा खर्च करण्याची यांची तयारी दाखविते.

गुरुचे पहिले बोट व अंगठा मजबूत व मोठा आहे. आध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठण्यासाठी गुरुचे बोट व निश्चय करून आपल्या तत्वाशी ठाम राहण्यासाठी मोठा असलेला अंगठा सत्य साईंच्या कामास आला आहे. हातावरील पहिल्या बोटाखाली असलेला गुरु ग्रह शुभ असून हा विद्वत्ता, धार्मिकपणा, धार्मिक उपदेश, सात्विकता, न्याय बुद्धी, शुद्ध आचरण, धार्मिक नेतृत्व या कारकत्वासाठी शुभदाई आहे. हातावरील बुध ग्रहाचा उभार करंगळीच्या खाली हाताच्या बाहेर आहे. बुध ग्रह हातावर शुभ व मोठा आहे. हा ग्रह चालाखी, चमत्कार, हुशारी इत्यादीसाठी शुभ असतो. त्यांच्या जीवनात त्यांनी या बुध ग्रहाच्या हुशारीचा लाभ घेतला.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com