चढ-उतारानंतरही सत्ताधारी प्रबळ !

लोकसभा 2024
चढ-उतारानंतरही सत्ताधारी प्रबळ !

राजयोग - डॉ. गोपालकृष्ण रत्नपारखी,ज्योतिष महामहोपाध्याय 9860038072

आगामी लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. पण राजकीय पट मांडणी सुरू झाली आहे. कोण येणार, कोण जाणार, कोणाचा कोणाशी राजकीय संग अन् काडीमोड याची चर्चा सुरू झाली आहे. करोनाने देशाच्या नागरिकांवर आघात केला, तसा अर्थव्यवस्थेवरही केला. परिणामी काही प्रमाणात राजकीय स्थितीतही बदल दिसून आला. आतापर्यंत ‘अति’लोकप्रिय असणार्‍या नेत्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. लोकप्रियतेवरही परिणाम झाला. त्यात बिघडलेल्या अर्थव्यवस्थेने जनतेलाही राजकीयदृष्ट्या पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. अलिकडेच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीने राजकीय ध्रुवीकरण तीव्रतेने मांडले. काही महिन्यांवर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यावरूनही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय राजकारण 2024 च्या लोकसभा निवडणुका एककल्ली होणार नाहीत, असा अंदाज व्यक्त होतो. पुढील तीन वर्षात अनेक घडामोडी होतील, यात शंका नाही. एकीकडे विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न आणि त्याचवेळी सत्ताधार्‍यांनी राजकीयदृष्ट्या कट्टर विरोधकांशी किमान चर्चा करण्याचे औदार्य दाखविल्याचे आपण नुकतेच पाहिले. त्यावरून 2024 ची चाचपणी सुरू आहे, याचे स्पष्ट संकेत आहेत. याच पार्श्वभुमिवर ज्योतिषशास्त्राद्वारे पुन्हा एकदा भारतीय राजकारणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्ही यापूर्वी वर्तविलेल्या राजकीय भाकिते तंतोतंत खरी ठरली. महाराष्ट्रातील राजकारणाचा त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. मात्र त्याबाबतचे भाकित आम्ही जवळपास दीड वर्षे आधी येथेच वर्तविले होते. जे तंतोतंत खरे ठरले. एवढेच नव्हे तर पश्चिम बंगालमधील राजकारणाचाही वेध दोन वर्षे आधीच घेतला. तोही अचूक ठरला. त्यामुळे 2024 च्या भारतीय राजकारणाचे चित्र काय राहील, यावर आम्ही कुंडली अभ्यासावरून मांडणी करत आहोत. निवडणुकांना अवकाश असला तरी प्रमुख नेत्यांची कुंडली स्थितीबाबत संकेत देत आहेत.

यासाठी आम्ही देशातील काही प्रमुख नेत्यांचा यासाठी विचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेख यादव या नेत्यांची ग्रहस्थिती आपण तपासणार आहोत. भारतीय राजकारणात बदलांसाठी उत्तर भारतीय प्रदेशांचा मोठा वाटा असतो. त्यासोबत 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांनी विरोधकांना रणनितीसाठी दिशा पुरविल्याने या प्रदेशातील नेतेही प्रबळ भुमिका बजावतील. नेत्यांची ग्रहस्थिती, त्यांच्यासाठी राजकीय परिणाम आणि त्याचे भारतीय राजकारणासाठीचे एकत्रित संकेत अशा क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. सत्ताधारी नेत्यांच्या कुंडलीत यश-अपयशाचा चढउतार दिसत असला तरी ते प्रबळ असल्याचे दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com