Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधपृथ्वी उत्तम स्थितीत असेल तरच जीवनही सुखी असणार

पृथ्वी उत्तम स्थितीत असेल तरच जीवनही सुखी असणार

आपण अशा कालखंडात जगत आहोत जेव्हा आपल्याला नेहमीच आपले पालन पोषण करत आलेल्या गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करावा लागतो. मानवतेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आपल्याला या ग्रहाचे संरक्षण करण्याबद्दल बोलले पाहिजे. यापूर्वी कधीच कोणालाही या ग्रहाचे रक्षण करावे अशी वेडी कल्पना उदभवली नव्हती.

या ग्रहाने नेहमीच आपली काळजी वाहिली.या ग्रहाचे पालनपोषण करणे आणि स्वतःसाठी एक उत्तम जीवनची आकांक्षा असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, कारण उत्तम ग्रहाशिवाय उत्तम जीवन नाही. आज आपण पर्यावरणीय समस्यांकडे असे पाहत आहोत की जणूकाही ते आपले एक प्रकारचे उत्तरदायित्व आहे, जे आपल्याला पूर्ण केलेच पाहिजे. हे काही आपले कर्तव्य नाही, ते तर आपले जीवन आहे. आपण घेत असलेला अवघा ेशासच आहे ते.जोपर्यंत लोकांना हे जाणवत नाही आणि अनुभवत नाहीत, तोपर्यंत मला वाटत नाही की ते खरोखरच मोठी पावलं उचलतील. जर लोक जमीनीची काळजी घेत नाहीत तर ते संपूर्ण देशाचाच नाश करतील. ज्याकाही आपल्या आर्थिक गरजा आहेत – आपल्याला पुष्कळ काही करण्याची गरज आहे –

- Advertisement -

पण आपण पर्यावरणाची चिंता आपल्या आर्थिक विकासाच्या योजनांचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणून नेहेमी डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. हा असा मुद्दा आहे जे धोरणकर्ते, उद्योगधंद्यांनी आणि जनतेने याप्रती सतत जागरूक असणे आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील गरजेचे आहे.याप्रती संपूर्ण जगाची जाणीव आणि जागृती वाढवणे हा एक दीर्घकालीन प्रकल्प असू शकतो, परंतु जर नेतृत्व – म्हणजे उच्चपदस्थ आणि अधिकार असलेले लोक, जर त्यांनी हे त्यांच्या आत अनुभवले तर आपण जे काही करतो त्यामध्ये एक मोठा बदल घडवून आणता येऊ शकतो. जर पृथ्वीवरील काही महत्वाच्या लोकांची चेतना – म्हणजे त्यांची विचार करण्याची, भावना, आणि आयुष्य अनुभवण्याची पद्धत – यात थोडासा जरी बदल करू शकलो, आणि जर योग्य दिशेने आवश्यक त्या संसाधनांची गुंतवणूक आणि लक्ष केंद्रित केलं तर धरती माता आपोआप स्वतःला सुधारेल.

जर आपण तिला फक्त एक संधी दिली तर ती सर्वकाही पूर्णतः परिपूर्णता आणि सौंदर्यात बदलेल. आम्हाला महान काहीतरी करण्याची गरज नाही; आम्हाला पृथ्वीची दुरुस्ती करण्याची गरज नाही. जर आपण आपल्याला शक्य तितकं, आपल्याला त्रासात न लोटता, आपला अनावश्यक दखल कमी केला, आपण करत असलेली नासधूस जर कमी केली, बाकी सर्वकाही आपोआप घडेल.आध्यात्मिक प्रक्रिया जी आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीची परवा न करत नाही एक अध्यात्मिक प्रक्रिया असूच शकत नाही कारण जो कोणी स्वतःकडे पाहतो, जो कोणी अंतर्मुख करतो त्याला नैसर्गिकरित्या कळते की त्याचे अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे वेगळे नाही.

मुलभूतपणे अध्यात्म म्हणजे सर्वसमावेशक अनुभव. जेव्हा सर्वसमावेशक अनुभव असतो तेव्हा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल कळकळ असणे हे अगदी स्वाभाविक आहे. एक पिढी म्हणून आपण सर्वार्थाने आपत्ती ठरू नये ही माझी इच्छा आहे. आपल्या आयुष्यात आपण जे करू शकत नाही ते जर आपण केले नाही तर काहीच हरकत नाही. परंतु आपण जे करू शकतो ते जर आपण केले नाही तर आपण एक आपत्ती आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या