जगणं सोपं आहे !

जगणं सोपं आहे !

दैनंदिन जीवनात आपल्या विचारप्रणालीची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या विचारांचा आपल्या मूडवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. याचा परिणाम आपल्या कृतीवरही होतो. या नकारात्मक गोष्टी टाळल्यास जगणं सोपं होऊ शकतं.

काहीच नाही हा दृष्टिकोन : असा विचार करणार्‍या व्यक्ती एकतर प्रचंड यशस्वी होतात किंवा सपशेल पराभूत होतात. अशा व्यक्तींची एखादी छोटीशी चूकसुद्धा मोठ्या पराभवाचं कारण ठरू शकते. टोकाच्या विचारसरणीमुळे या व्यक्तींचा भर अचूकपणावर असतो; पण त्याचवेळी ही विचारसरणी आत्मविेशासाला धक्का देण्यासही कारणीभूत ठरू शकते. अशा व्यक्तींनी स्वतःच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं टाळलं, तर आयुष्यात त्यांना नैराश्य येणार नाही.

वाईट गोष्ट वारंवार घडण्याचा विचार : एखादी वाईट गोष्ट घडल्यानंतर ती वारंवार घडणार आहे, असं अनेकजण गृहीत धरतात. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीनं एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला, तर आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती नकारच देईल, याबाबत काहींची खात्री असते. भविष्यात होऊ शकणार्‍या घटनांचा अधिक विचार करणं धोकादायक ठरतं.

नकारात्मक मानसिकता : कुठल्याही गोष्टीची सकारात्मक बाजू पाहण्याऐवजी अनेकजण त्यातील दोष शोधत असतात. अशा प्रकारच्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे.

सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष : सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणार्‍या व्यक्ती चांगल्या घटनांचाही नकारात्मक पद्धतीनं विचार करतात. चांगल्या कामाची दखल घेऊन पगारवाढ मिळाली, तर अधिक पगारवाढ का मिळाली नाही, याचा विचार करत काही जण स्वतःचा आत्मविेशास गमावून बसतात. सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, वैयक्तिक प्रगतीतील मोठा अडथळा ठरू शकतं.

थेट निष्कर्ष : ज्योतिषी किंवा मनकवडा असल्याप्रमाणे काही लोक छोट्या छोट्या घटनांमधूनही मोठं संकट निर्माण होणार असल्याचा निष्कर्ष काढतात. एखाद्या मित्राला फोन केल्यानंतर त्यानं कॉल बॅक केला नाही, तर त्याला आपण आवडत नाही, असा विचार करणारे बरेच आहेत. एखादी नोकरी मिळाल्यानंतर लवकरच ती आपल्याला सोडावी लागणार असल्याची मानसिकता ठेवूनच काही जण काम करतात. हे टाळलं पाहिजे.

पराचा कावळा करणं : काहीजणांना प्रत्येक गोष्ट मोठी करून किंवा अतिशयोक्ती करून सांगण्याची सवय असते. अशा लोकांना छोट्या समस्या एकदम मोठ्या दिसू लागतात, तर मोठं यश अगदी छोटं दिसू लागतं. असे लोक स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आजाराचे बळी ठरू शकतात. भावनिक अडचणीच्या काळात स्वतःची कीव करत अनेक जण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. तुमची मानसिकता तुमचं खरं व्यक्तिमत्त्व दर्शवते, असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही पराभूतासारखे वागू लागता. परिणामी, स्वतःला पाठिंबा देण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मानसिकता निर्माण करून आणि विशिष्ट व्यक्तिमत्त्व सगळ्यांसमोर येईल, असा प्रयत्न आपण करतो.

झालं पाहिजे आणि केलंच पाहिजे : टू डू लिस्टचा विचार करण्याची अनेकांना सवय असते. दररोज रात्री अपूर्ण कामांचा पाढा वाचत अशा व्यक्ती स्वतःला कमी लेखतात. इतरांनी काय केलं पाहिजे, याचा विचार करत असे लोक विनाकारण नैराश्य आणि कटुता ओढवून घेतात. त्यामुळे अशा प्रकारच्या विचारांपासून ताबडतोब दूर झालं पाहिजे. तुम्हाला अदर्श वाटत असलेल्या पद्धतीनंच प्रत्येकानं वागलं पाहिजे, हा अट्टाहास आपण सोडायला हवा.

स्वतःची प्रतिमा तयार करणं : आपण आपला स्व आणि आपल्या कृतींची एकमेकांशी तुलना करतो. पृथ्वीवरील प्रत्येकच व्यक्ती चुका करत असल्यामुळे काही काळानंतर आपल्या प्रत्येक चुकीबद्दल आपण स्वतःची नकारात्मक प्रतिमा तयार करत जातो. आपण केलेला एखादा मोठा करार अपयशी ठरला, तर आपण नेहमीसाठीच अपयशी ठरू, असं वाटू लागतं. त्यामुळे स्वतःची अयशस्वी, पराभूत अशी प्रतिमा तयार करतो. अशा प्रकारचा विचार इतरांबाबतही केल्यास आपण विनाकारण शत्रुत्व पत्करतो.

प्रत्येक गोष्टीचं वैयक्तिकीकरण : आपली चूक असली किंवा नसली, तरीही आपल्याभोवती घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी काहीजण स्वतःला जबाबदार धरतात. असा दृष्टिकोन तुमच्यातील नकारात्मक मानसिकता दर्शवतो. त्याचा आपल्यापैकी प्रत्येकावरच प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष परिणाम होतो. हे विचार कोणते आहेत, हे कळलं, तर अधिक जागरुकपणे त्यांच्याकडे बघता येईल.

परिवारात शांततेसाठी काही नियम

घराच्या प्रवेशदारात स्वस्तिकाची आकृती लावल्याने घर-परिवारात शांतीची स्थिती निर्माण होते.

ज्या घरात किंवा जागेवर मंदिराची पाठ पडत असेल तेथे राहणारे लोक नेहमी अडचणीत असतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.

समृद्धीसाठी उत्तर-पूर्व दिशेत पाण्याचे कलश ठेवावे.

घरात ताण तणाव किंवा अशांती असेल तर बैठकीत फुलांचा गुलदस्ता ठेवायला पाहिजे.

ग्रंथ नेहमी नैऋत्यकडे, दक्षिणेस किंवा पश्चिमेस ठेवावेत, त्यास कालत्रयी ईशान्येस ठेऊ नये. ग्रंथालयात कोणत्याही प्रकारचे आरसे नसावेत, त्यामुळे वाचकांची एकाग्रता कमी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com