भूमिपरीक्षण कसे करावे !

वास्तू निर्मिती करताना योग्य जागा निवडण्यासाठी काही भूमिपरीक्षण करण्याच्य सोप्या पद्धती
भूमिपरीक्षण कसे करावे !

पद्धत क्र. 1 -

एक फूट रुंदी व एक फूट लांबी व एक फूट खोली असलेला खड्डा प्लॉटमध्ये खोदावा. त्यानंतर खोदून काढलेली माती पुन्हा त्या खड्ड्यात भरावी. खड्डा भरून माती उरल्यास ती भूमी चांगली जाणावी.

पद्धत क्र. 2 -

वरीलप्रमाणे खड्डा करून त्यात पूर्ण पाणी भरणे व खड्ड्यापासून 100 पावले चालत जाऊन परत येणे. या वेळात शिल्लक पाणी 3/4 कमी झाल्यास ती भूमी अयोग्य जाणावी. पाणी निम्म्यापेक्षा जास्त राहिल्यास उत्तम भूमी जाणावी.

पद्धत क्र. 3 -

वरील प्रमाणे सूर्यास्तास खड्डा पाण्याने पूर्ण भरणे आणि सूर्यादयाला परीक्षण करणे. जर पणी निम्म्यापेक्षा जास्त शिल्लक असेल तर जमीन उत्तम. जर पाणी आटून पूर्ण तळाला भेगा पडाल्या असतील, तर ती भूमी अत्यंत वाईट जाणावी.

पद्धत क्र. 4 -

वरील प्रमाणे खड्ड्यात पाणी भरणे जर पाणी प्रदक्षिणा मार्गाने फिरत असेल तर चांगले, उलट फिरत असल्यास अशुभ परिणाम जाणावेत.

पद्धत क्र. 5 -

प्लॉटच्या काही भागात बी पेरून त्याचे अपेक्षित कालात मोड आल्यास उत्तम न आल्यास अशुभ.

प्लॉटची जमीन :

ज्या जमिनीवर वनस्पती झाडे उगवतात. ती जमीन सजीव भूमी समजली जाते. अशी जमीन वास्तूसाठी शुभ असते. ज्या जमिनीत वनस्पती, हिरवे गवत उगवत नाही, जिथे किंचित ओलावा नाही, जी जमीन खारी आहे, ज्या जमिनीत काटेरी वनस्पती उगवतात किंवा जी जमीन खडकाळ, रेताड असेल अशा भूमीला मृत भूमी समजतात. अशी भूमी वास्तू निवासासाठी अयोग्य असते. या जागेत रहिवाशाची प्रगती होणे अशक्य असते. त्याचप्रमाणे मनस्वास्थ्य लाभत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com