जमिनीचा चढउतार
भविष्यवेध

जमिनीचा चढउतार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

चुंबकीय क्षेत्रानंतर जमिनीच्या चढउताराबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे कारण चुकीच्या जागेचा चढ किंवा उतार अपायकारक ठरतो. त्याचप्रमाणे जर पूर्वेला भर असेल तर धनप्राप्ती, आग्नेयेला दाह, दक्षिणेला मृत्यू, नैरृत्येला धननाश, पश्चिमेला पुत्रनाश, वायव्येला परदेशात वास्तव्य, उत्तरेला धनागम, ईशान्येला विद्या लाभ होतो. जमिनीच्या मध्ये खड्डा असल्यास कष्टदायक असते. ईशान्येला खड्डा असल्यास घरमालकाला धन-सुख, पूर्वेला वृद्धी, उत्तरेला धनलाभ, आग्नेयेला मृत्युशोक, दक्षिणेला गृहनाश, नैऋत्येला धनहानी, पश्चिमेला अपयश तर वायव्येला मानसिक उद्वेग होतो.

या प्रकारे जमिनीच्या चढउताराला आपण खालील क्रमाने ठेवू शकतो.

* पूर्व व आग्नेय दिशेला उंच, पश्चिम व वायव्येला उतार असलेली जमीन शुभ असते.

* जमिनीचा चढ दक्षिण व आग्येय दिशेला असेल तर आणि पश्चिम व उत्तरेला उतार असेल तर सर्व कार्यांचे फळ शुभ मिळते.

* नैऋत्य आणि दक्षिणेला चढ व उत्तर व ईशान्येला उतार घराला स्थिरता देतो.

* पश्चिमेला चढ व ईशान्य तसेच पूर्वेला उतार पुत्र कारक असतो.

* वायव्य व पश्चिम दिशेला उंच व पूर्व आणि आग्नेयेला उतरण भांडणांना जन्म देते व तेथे राहण्याची इच्छा होत नाही.

* वायव्य व उत्तरेला चढ आणि दक्षिण व आग्नेयेला उतार असणार्‍या घरात रहाणार्‍या व्यक्ती रोगाने पछाडलेला असतो.

* दक्षिणेत भर व नैऋत्येला उतार असणार्‍या जमिनीवर हत्या होते.

* दक्षिणेला चढ आणि पश्चिमेला उतार असल्याने भूत बाधा, धन, पुत्र आणि पशुहानी संभवते.

* नैऋत्य, ईशान्य व वायव्येला वर आणि आग्नेयेला उतार असणार्‍या जमिनीत पूर्णपणे नाश होतो.

* ज्या जमिनीचा उभार उत्तर आग्नेय आणि पश्चिमेला असून खोलवा फक्त नैऋत्येला असेल तर अशा घरात राहणारे लोक कायम दरिद्री असतात.

* नैऋत्य, आग्नेय व उत्तरेला चढ, वायव्य तसेच पूर्वेला उतार असेल तर त्या घरात राहणारे अल्पायुषी होतात.

* आग्नेयेला उभार आणि नैऋत्य व उत्तरेला उतार असणार्‍या जमिनीवर स्थैर्य मिळते.

* नैऋत्येला चढ व आग्नेय तसेच वायव्येला उतार अशा ठिकाणी राहणारे लोक धार्मिक व वैरागी असतात.

* उत्तरेचा उभार अन् आग्नेय, नैऋत्य व वायव्येचा उतार कल्याणकारी असतो.

* ज्या जमिनीचा चढ नैऋत्य व आग्नेयेला आणि उतार उत्तरेला असतो त्या जमिनीवर राहणार्‍याची उत्तरोत्तर प्रगती होते.

* पूर्वेला उतार आणि नैऋत्य व पश्चिम दिशेला चढ असणार्‍या जमिनीवर राहणार्‍याला उच्चपद मिळते.

* उत्तर व वायव्येला उठाव आणि दक्षिण खाली अशी जागा व्यापारासाठी उपयुक्त.

* मध्ये उतार आणि बाजूने चढ कोणत्याही दृष्टीने चांगला नाही.

* गजपृष्ठ म्हणजे नैऋत्य व वायव्येला उंच असणारी जमीन आयुष्य व संपत्तीत वाढता वसा देते.

* कर्मपृष्ठा म्हणजे ईशान्येला चढ असणार्‍या जमिनीत लक्ष्मीचा निवास नसतो.

* नागपृष्ठा म्हणजे पूर्व-पश्चिम लांब उत्तर, दक्षिणेला भर असणारी जमीन हानिकारक आहे.

* पूर्व, उत्तर व ईशान्येला उतार असणारी जमीन शुभ फळ देते. शेवटी दिशेच्या उतारानुसार मिळणारे परिणाम पुढील प्रमाणे.

* पूर्वेला उतार - उत्तम वंशवृद्धी, ज्ञानवृद्धी, बल व धन प्राप्ती.

* आग्नेयेला उतार - खर्चात वाढ, दु:ख

* दक्षिणेला उतार - धन-नाश, वंश-नाश, मृत्यू संभव

* नैऋत्येला उतार - रोग, त्रास, चोर भय, धन-नाश

* पश्चिमेला उतार - धन नाश, आर्थिक संकट.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com