वास्तूनुसार जाणून घ्या कोणती झाडे लावायची

वास्तूनुसार जाणून घ्या कोणती झाडे लावायची

लोकांना सहसा घरात झाडे लावण्याची आवड असते. परंतु जर तुम्हाला कळले की अशी काही झाडे आहेत जी तुमच्या घराची फक्त शोभाच वाढवणार नाही तर सोबतच तुमचे जीवन आनंदात विलीन करून टाकेल. तर नक्कीच तुम्हालाही ती झाडे तुमच्या घरात ठेवायला आवडतील. वास्तुशास्त्रात याविषयी सविस्तर माहिती मिळते. ती झाडे कोणती त्वरित जाणून घ्या आणि त्याला ठेवण्याचे फायदे पाहा ....

सर्वप्रथम हे झाड लावा - वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तरेकडील किंवा पूर्वे दिशेला आवळ्याचे झाड असावे. मानले जाते की जर या वनस्पतीची नियमितपणे पूजा केली गेली तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर ज्या काही इच्छा असतात, त्याही पूर्ण होतात.

या झाडामुळे संपत्ती-संतान प्राप्ती होते - वास्तुशास्त्रानुसार मालमत्ता-संततीची इच्छा असेल तर घरात दुर्वा लावली पाहिजे. मानले जाते की, असे केल्याने जीवनातील दुःख देखील दूर होते. यासोबतच सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती होते.

या वनस्पतीची लागवड केल्याने अपार कृपा प्राप्त होते - वास्तुशास्त्रानुसार घरात पारिजात लावल्याने सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो. मानले जाते की जर पारिजातकाची फुले देवाला अर्पण केली तर त्या व्यक्तीला सोने दान करण्याइतकेच पुण्य मिळते.

या वनस्पतीची लागवड केल्याने सुख आणि समृद्धी मिळते - वास्तुशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीची इच्छा असेल तर घरात बांबूचे झाड लावावे. हे घराच्या कोणत्याही ठिकाणी लावू शकतो. मानले जाते की ते लावल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात असलेली नकारात्मकता देखील दूर होते. यासोबतच कार्यक्षेत्रातही प्रगती होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com