Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधया वस्तू योग्य दिशेला ठेवा

या वस्तू योग्य दिशेला ठेवा

फेंगशुईच्या मतानुसार अश्या बर्‍याच वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. अशा 5 गोष्टी आहेत जर त्यांना योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेसह सौख्य आणि भरभराट येते.

ताजे फुलं घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. हे फूल कोमेजल्यावर आणि सुकल्यावर घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि आजार येतात.

- Advertisement -

घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडे ठेवणे किंवा रोपटं ठेवणे अशुभ असतं. ही दिशा नातं आणि लग्नाच्या इच्छेशी निगडित असते. या दिशेला झाड किंवा रोपटं ठेवल्याने लग्न कार्यात अडथळा आणि वैवाहिक जीवनात कलह होतो.

नारंगी आणि लिंबाची रोपटं सौभाग्य आणि भरभराटीची सूचक असल्याने हे घराच्या बागेत दक्षिण-पूर्व दिशेला लावल्याने धन-संपत्ती प्राप्त होते.

घरातील दक्षिण दिशेला निळा रंग आणि पाण्याचे चित्र लावू नये. हे कुटुंबियातील सदस्यांच्या सन्मान आणि प्रगतीत अडथळा निर्माण करतं.

घराच्या पूर्व दिशेस धातूपासून बनवलेल्या वस्तू ठेवू नये. या दिशेला ठेवल्याने एखादी व्यक्ती काळजी आणि नकारात्मक ऊर्जेने व्यापते.

बैठकीत मोर, पक्षी, माकड, सिंह, गाय, हरीण असे चित्र किंवा जोडप्यात मूर्ती ठेवाव्या. लक्षात ठेवा की, यांचे तोंड घराच्या आतील बाजूस ठेवावं. असे केल्यास शुभ-लाभ मिळतात.

जमिनीवर बसण्याचे फायदे

आजच्या काळात असे फार कमी लोकं आहे ज्यांना खाली जमिनीवर बसणं आवडतं. बरेच लोकं खुर्ची वर बसून आपले काम करण्यास प्राधान्य देतात पण आपणास ठाऊक आहे का की खुर्चीवर बसल्याने आपण आपल्या बर्‍याचशा स्नायूंचा वापर करत नाही अशा परिस्थितीत आपल्याला

जमिनीवर बसल्यावर उठायला त्रास होतो. जर आपण देखील त्यापैकी एक आहात, ज्यांना जमिनीवर बसण्यापेक्षा खुर्चीवर बसणं जास्त आवडत, तर एकदा जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून घ्या, नक्कीच आपण फायदे जाणून घेतल्यावर खुर्ची वर बसणं नेहमीसाठी विसराल.

जर आपण जमिनीवर बसलात तर अशामुळे शरिराची मुद्रा सुधारते. ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते, जमिनीवर बसून आपोआप त्यात सुधारणा येते.

जमिनीवर बसल्याने खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात.

जमिनीवर बसल्याने आतील स्नायू देखील बळकट होतात. जर आपल्याला पाठदुखीचा त्रास आहे तर जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.

जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात.

जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरिरात लवचीकपणा वाढतो, जे खुर्चीवर बसून नाही होत. बर्‍याच वेळ खुर्चीवर बसून गुडघ्यामागील शिरा ताठ होतात, ज्यामुळे त्या वेदनेला कारणीभूत असतात.

जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते. ते असे की आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो, तेव्हा आपण पुढे मागे जातो आणि या प्रक्रियेत पोटाच्या स्नायूंवर दाब पडतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या