घरामध्ये ठेवावा तांब्याचा पिरॅमिड

घरामध्ये ठेवावा तांब्याचा पिरॅमिड

वास्तुशास्त्रामध्ये घराची नकारात्मक ऊर्जा Negative energy दूर करून सकारात्मक ऊर्जा Positive energy वाढवण्यासाठी विविध टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्या घरामध्ये वास्तुदोष Architectural defects असेल तेथे नकारात्कता कायम राहते. म्हणूनच वास्तुदोष दूर करण्यासाठी घराध्ये पिरॅमिड ठेवावा. येथे जाणून घ्या, सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तूच्या काही खास वस्तूंविषयी..

एकाग्रता आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी घरात पिरॅमिड Pyramids ठेवू शकता. लक्षात ठेवा, पिरॅमिड तांबे copper, पितळ brass किंवा पंचधातूचे ठेवणे अत्यंत शुभ राहते. घरामध्ये कधीही लोखंड किंवा अ‍ॅल्युमिनिअमचा Iron or aluminum पिरॅमिड ठेवू नये.

घरामध्ये लाकडाचा पिरॅमिड ठेवणेही शुभ मानले जाते. घरामध्ये पावित्र्य कायम ठेवण्यीासाठी गंगाजल कलश ठेवावा. घरामध्ये मुख्यद्वारावर आंब्यांचे पानांचे तोरण बांधावे. याच्या प्रभावाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा Positive energy प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा Negative energy बाहेरच राहते.

देवघरामध्ये नारळ, चांदीचे नाणे ठेवणे अत्यंत शुभ राहते. देवघरामध्ये चांदीच्या मूर्ती ठेवून पूजा करावी. पूजन कार्यासाठी चांदी सर्वात उत्तम धातू मानला जातो. घराच्या मुख्यद्वारावर स्वस्तिक काढावे. याच्या शुभ प्रभावाने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही.

दारासमोर महालक्ष्मीचे चरण चिन्ह काढावेत. हे शुभ चिन्ह घराच्या सुख-समृद्धीमध्ये वृद्धी करणारे मानले जातात. दारावर ओम चिन्हही काढू शकतात. श्रीकृष्णाचा सुंदर फोटो घरात लावल्याने मानसिक तणाव दूर होऊ शकतो. फोटोध्ये गोमता, बासरी वाजणारे श्रीकृष्ण असावेत. असा फोटो मनाला शांती देतो आणि घरातील वातावरण सकारात्क बनवतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com