कलामांवर होती चंद्र, शुक्र व सूर्याची कृपा!

भविष्य आपल्या हाती
कलामांवर होती चंद्र, शुक्र व सूर्याची कृपा!

अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पंबन बेटावरील रामेश्वरमच्या तीर्थक्षेत्री एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. कलाम यांना़ कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी वर्तमानपत्रे विकावी लागली. कलाम यांनी त्याच्या अभ्यासावर, विशेषतः गणित विषयावर अथक मेहनत घेतली. कलाम यांनी 1954 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते 1955 मध्ये मद्रासला गेले. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला, 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

अब्दुल कलाम 2002 पासून 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा हा त्यांच्या अभ्यास आणि संशोधनाचा विषय. त्यांनी दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे काम केले. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावरील कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जातात. 1998 मध्ये भारताच्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. 1974 मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर ही पहिलीच चाचणी होती.

कलाम ह्यांचे शालेय शिक्षण सामान्य शाळेत झाले. त्यांचा हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक नव्हता. कलाम हे त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वर्तमानपत्र विकत असत. एक वर्तमानपत्र विकणारा मुलगा हा भारताचा राष्ट्रपती होतो, या स्थितीत कलाम यांच्या हातावरील रेषा व ग्रह पाहणे औत्सुक्याचे ठरते. भारतातल्या सर्वोच्चपदी वर्णी लागण्यासाठी राजकारण्यांचा पाठिंबा लागतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक होते. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी जाहीर केले व सर्व पक्षीय पाठिंबा मिळवत ते भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.

कलाम यांची 2002 मध्येे भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती पदाच्या पाच वर्षाच्या कालखंडनंतर शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात ते परतले. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना, कलाम कोसळले आणि 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

हाताच्या बोटांच्या व एकूण हाताच्या आकारावरून व्यक्तीची हुशारी, स्वभाव व मानसिकता कळते. हातावरील रेषा व्यक्तीच्या आयुष्यातील सुख दुःखांचा-मान सन्मानाचा कालनिर्णय दाखवितात. हातावरील रेषा ज्या ग्रहावरून उगम पावतात व ज्या ज्या ग्रहावर त्या पोहोचतात त्या त्या ग्रहांचे शुभ अशुभ कारकत्व लाभत असते. हातावरील रेषांचा उगम हा सर्वसाधारणपणे सर्व व्यक्तीच्या हातावर निर्धारित असतो. त्या रेषांच्या उगम आणि शेवट होण्यात मोठा बदल असेल व्यक्तीच्या आयुष्यातील त्या रेषांच्या कारकत्वामुळे सुख-दुःखे सामान्य नसतात. तर त्यांच्या आयुष्यात असामान्य घटना घडतात. त्या सुखकारक किंवा दुःख कारक असतात. म्हणूनच म्हण आहे कि दैव जाणिले कुणी? हस्त सामुद्रिक अभ्यासक मात्र हातावरच्या रेषा, ग्रह, चिन्ह इत्यादी पाहून संपूर्ण आयुष्याची दिशा कोणती हे सांगू शकतात.

आयुष्य रेषेतून सूर्य ग्रहावर थेट गेलेली रेषा - आयुष्य रेषेतून सूर्य ग्रहावर थेट गेलेली रेषा, रवि म्हणजेच सूर्य -रवी ग्रह-मान सन्मान, कीर्ती, प्रसिद्धी देतो. आयुष्य रेषेतून रवी ग्रहावर थेट जाऊन थांबलेली रेषा, अखंड रेषा दहा लाखात एखाद्या हातावर असू शकते. थोडेफार नशीब घेऊन आलेल्या सामान्य व्यक्तीची भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावते. परंतु रवी रेषा आयुष्य रेषेतून उगम पावत असेल तर ती असामान्य घटना असते. तिसर्‍या बोटाच्या पेर्‍यातून म्हणजे रवि व बुध ग्रहाच्या दोन बोटांच्या मधून रवी ग्रहावर उतरलेली गोलाई घेतलेली रेषा आंतरराष्ट्रीय ख्याती देते, मान सन्मान देते.

शुक्र ग्रहावरून उगम पावणारी व मस्तक रेषेत जाऊन मिळणारी रेषा - शुक्र ग्रह ऐश्वर्य देतो. एक सामान्य व्यक्ति देशाच्या संरक्षण विभागात उच्च पदे सांभाळते, आणू चाचणी, रॉकेट चा विकास करणे व संशोधन विकास खात्याची प्रमुख म्हणून काम करताना, सरकारतर्फे त्या व्यक्तीला सर्व सुविधा पुरविल्या जातात व या सुविधांच्या उपभोगाचे कारकत्व शुक्र ग्रहात असते. मणिबंधापासून शुक्र ग्रहातून उगम पावलेली एक रेषा मस्तक रेषेत जाऊन मिळाल्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व अक्कल हुशारीवर कलाम यांना आपोआपच सुविधा प्राप्त झाल्या.

कलाम यांच्या हातावरील असामान्य मस्तक रेषा -कलाम यांच्या हातावरील असामान्य मस्तक रेषा हातावरील बाकी रेषांपेक्षा लांब आहे. तीला दोन फाटे असून पहिला फाटा चंद्र ग्रहावर हाताच्या मध्यभागी गेला आहे. दुसरा मस्तक रेषेचा फाटा रवी बोटाखाली रवी रेषेत विलीन होत चंद्र ग्रहावर मनगटापासून एक इंचावर अलिकडे थांबला आहे. चंद्र ग्रहावर हाताच्या बाहेरून एक आडवी रेषा येऊन चंद्र ग्रहाच्या खालच्या बाजूला मस्तक रेषेत जाऊन मिळत आहे. अशी मस्तक रेषा सामान्य व्यक्तीच्या हातावर पाहावयास मिळत नाही. मस्तक रेेषा ही बुद्धिमत्तेची कारक आहे. ती चंद्र ग्रहावर उतरल्यास विविध असामान्य कल्पना सुचतात. कलाम हे शास्त्रज्ञ गणित विषय आवडीच होता त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष्य साकार करण्यासाठी हातावरील मजबूत अंगठ्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्या हातावरील अंगठा निश्चयी आहे. ठरलेले काम वेळे आधी पूर्ण करण्याच्या त्यांचा प्रयत्न असे. मस्तक रेषा व हृदयात रेषेत वयाच्या 60 ते 70 वयापर्यंत अंतर कमी झालेले आहे व त्यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण व काळजी, असुरक्षितता त्यांनी अनुभवली असणार आहे.

कलाम यांच्या हातावरील वरचा मंगळ व चंद्र ग्रह - कलाम यांच्या हातावरील चंद्र ग्रह दोन विभागात आहे. पहिला विभाग मुख्य मस्तक रेषेच्या खाली, दुसरा विभाग मुख्य मणिबंधापासून मस्तक रेषेच्या फाट्यापर्यंत. चंद्र ग्रहाचे विभाग स्वच्छ व उभार घेतलेले आहेत. चंद्र मनाचा कल्पनेचा कारक आहे. चंद्र ग्रह मणिबंधाच्या वर अतिरिक्त उभार घेतल्याने त्यांच्यात विद्वत्ता मोठी लाभली आहे. वरचा मंगळ ग्रह स्वच्छ आहे त्यावर आडव्या शत्रू रेषा आहेत. पण त्या खूप क्षीण आहेत. त्यामुळे त्यांना शत्रू भय नाही. मंगळ ग्रह उभार घेऊन आहे त्यामुळे विचारपूरक निर्णय क्षमता आहे त्यात कोणतीही घाई नाही.

कलाम यांच्या हातावरील वैशिष्ठ्यपूर्ण बोटांचे आकार - कलाम यांच्या बोटांचे आकार खूप वेगळे व वैशिष्ठय पूर्ण आहेत. अशा प्रकारच्या बोटांचा आकार पाहावयास मिळत नाही. बोटांचे पहिले पेरे फुगीर आहेत. करंगळी टोकदार व अन्य बोटांची टोके गोल आहे. पहिल्या पेर्‍यानंतर बोटे निमुळती होत गेलेली आहेत. तिसर्‍या पेर्‍याच्या आधी जाड होत जाऊन पहिल्या तीनही बोटातील सांधे मोठे आहेत. तीनही बोटांच्या सांधे रुंद व त्याखालील तिसरे पेरेही तितकेच रुंद आहेत सहसा अशी बोटांची रचना पाहावयास मिळत नाही. रुंद सांधे व बोटे यांच्यामुळे विश्लेषण व संवेदनांची आकलन शक्ती असामान्य व विचारपूर्वक आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे व्यक्तीला ज्या संवेदना येतात त्या संवेदनांचे ग्रहण बोटांच्या टोकातून होते. या बोटांच्या मुळाशी गुरु,शनी,रवि व बुध ग्रह विराजमान असतात व या ग्रहांच्या त्या त्या व्यक्तीतील कमी जास्त गुणधर्माप्रमाणे संवेदनांची आकलन शक्ति व्यक्तिपरत्वे भिन्न असते. म्हणजेच बोटांच्या आकाराबरोबर ग्रह शुभ असावे लागतात. व्यक्ती संवेदना ग्रहण करताना टोकदार बोट असेल तर विना चिकित्सा संवेदना ग्रहण होतात. बोटे टोकाला गोल आकाराची असतील तर संवेदनांचे पृथकरण करून त्यांना प्रवेश दिला जातो. संवेदनांचे पृथकरण बोटांच्या टोका नंतर परत बोटांच्या सांध्यामध्ये होते व त्या त्या ग्रहाच्या प्रभावा खालील किंवा गुणधर्मा नुसार संवेदनांचे आकलन होते. संवेदना बोटांकडून घेताना तळ हातावरील मुख्य रेषेतून त्या मेंदूकडे पोहोचविल्या जातात. डोळे प्रतिमा घेतो, कान ऐकण्याचे काम करतो व नाक सुवास. या सर्वांचे एकत्रित संवेदना ग्रहण करताना सेकंदाच्या एका अंशात एकत्रित प्रक्रिया घडून येते. कलाम यांचे बुधाचे म्हणजेच करंगळीच्या बोट टोकदार असल्याने संवेदना ग्रहण करण्याची अफाट शक्ती होती. ते हजरजवाबी होते. एखादी गोष्ट त्यांना दोनदा सांगण्याची गरज नसे. बुध ग्रहाची तल्लख हुशारी त्यांचेकडे होती. म्हणूनच त्यांचा मेंदू म्हणजे एक संगणकच होता.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com