Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधओळख रत्नांची

ओळख रत्नांची

मागील भागात आपण 1) फिरोजा, 2) पायराइट (धनाकर्षक) 3) ग्रीन प्लोराइट 4) रेड जस्पर 5) लॅपिस लॅझुली 6) टायगर आय या रत्नांची माहिती पाहिली आहे. या भागात आपण त्या पुढील रत्नांची माहिती घेणार आहोत.

7) र्‍होडोक्रोसाईट ,प्रकार – मॅग्नीज कार्बोरेट

- Advertisement -

रंग – गुलाबी, कधी पांढरे किंवा पिवळसर हलके पट्टे, जरी भडक गुलाबी ते लाल या रंगादरम्यान आढळत असला तरी क्वचित भगवा, पिवळा व चॉकलेटीही सापडू शकतो.

शारीरिक उपचार – रक्ताभिसरण, हृदयाचे आजार, ब्लडप्रेशर, अस्थमा, अर्धशिशी.

भावनिक उपचार – आपल्या शरीरातील मानसिक चक्रातील काही कारणाने बंद झालेल्या उर्जा स्त्रोतांना उघडण्यास चालना देईल. त्यामुळे पृथ्वी तत्त्वातून निघणारे प्रकाश व जीवन उर्जा मूळ चक्राद्वारे शरीरात वरपर्यंत तसेच हृद्यचक्राद्वारे मुकुटापासून खाली पृथ्वीपर्यंत पोहचेल. ह्या हालचालीमुळे माणसाचा भविष्यकाळ सुकर होईल.

व्यावहारिक उपयोग – पहिल्यांदा शाळेत-कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांसाठी उपयोगी. ह्यामुळे त्यांना लवकर मित्र-मैत्रिणी भेटतील व नवीन वातावरणात रमुन जाण्यास मदत होईल.

कामाच्या ठिकाणी- लहान जागेत, दाटीवाटीने काम करणार्‍यांसाठी खेळीमेळीने काम व्हावे म्हणून र्‍होडोक्रोसाईट वापरता येईल. जेथे व्यक्तिमत्व व्यावसायीकपणाच्या आड येत असेल त्या ठिकाणी र्‍होडोक्रोसाईटची मदत घ्यावी.

र्‍होडोक्रोसाईट माणसातील मना-मनाचा संवाद घडवून आणण्यास मदत करतो. तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मित्र किंवा नातेवाईकांशी किंवा दूर असलेल्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधायचा असल्यास तुम्ही र्‍होडोक्रोसाईटचा टेलीपॅथीक उपाय करून पहा. तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीच्या फोटो शेजारी हा खडा ठेवा. त्या खड्याभोवती तुम्ही दोन्ही हात ठेवुन त्या व्यक्तीचे तीनदा नाव उच्चारा व लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधण्याची मनापासुन विनंती करा. ती व्यक्ती तुम्हाला भेटेल असा सकारात्मक विचार करा. तुमची इच्छा पूर्ण होईल.

8) रेनबो मुनस्टोन,प्रकार- फेल्डस्पर

रंग – दुग्ध पांढरा इंद्रधनुष्य छटांसह.

शारीरिक उपचार- हार्मोन्स, फर्टीलीटी, थॉयरॉइड, पिट्युटरी ग्रंथी, स्तन व गर्भपिशवी संबंधित शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीस उपयुक्त.

भावनिक उपचार- एकटे वाटणार्‍या, स्वत:त हरवणार्‍या, एकलकोंड्या लोकासाठी फारच हा खडा उपकारक आहे. सर्वच भावनिक उपचारांसाठी ह्याचे महत्त्व आहे.

व्यवहारीक उपयोग- तुमच्या झाडांच्या सुदृढ वाढीसाठी व फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी पौर्णिमेच्या तीन दिवस आधी किंवा जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसेल तेव्हा हा खडा बागेत ठेवा.

कामाच्या ठिकाणी- कर्मचार्‍यांच्या संवेदनशील समस्या सोडवताना किंवा कामगार वर्गाशी सलोख्याचे संबंध जोडताना हा खडा जरूर परीधान करावा.

रेनबोस्टोन तुमच्या उशीखाली किंवा जेथे चंद्रकिरण पडतात अशा जागी ठेवल्यास तुम्हाला शांत झोप लागुन गोड स्वप्ने पडतील. रेनबोस्टोन फार सौम्य आहे. तो तुम्हाला दिर्घ आजारातून मुक्त होण्याची शक्ती देईल, स्वत:ला इजा पोह्चवणार्‍या व्यक्तीमधील अशी प्रवृतींपासून दुर नेण्यास हा खडा त्यांना सहाय्यक ठरेल. मुलांमधील शैक्षणिक समस्यांचे निर्मुलन करण्यास मदत करील.

9) रुबी इन फससाईट,प्रकार – सिलीकेट, कोरन्डमच्या समावेशासह

रंग – हिरवा, लाल रंगाच्या समावेशासह.

शारीरिक उपचार – सततचा ताण, जखम, प्रतिकार शक्ति, इन्फेक्शन, मणका, तांबड्या-पांढर्‍या पेशी, चालताना तोल जाणे, हृदयाची आजारानंतरची रिकव्हरी इ. वर प्रभावी.

भावनिक उपचार – आकस्मित धसक्यातुन किंवा निराशेतून बाहेर पडण्यास मदत होते. सत्य परिस्थितीला सामोरी जाण्याचे धैर्य प्राप्त होते. समस्या कितीही निकट असो, निराश न होता, न घाबरता ती सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टी प्राप्त होते.

व्यवहारिक उपयोग – अनपेक्षित घटना घडणे, कल्पनेपलीकडील गोष्टी समोर येणे. सरकारी कर्मचार्‍यांच्या होणार्‍या वारंवार बदल्यांमुळे येणारा ताण, अशावेळी हा खडा ठेवावा.

कामाच्या ठिकाणी- काम करताना अनेक लोकांशी संबंध येतो. ज्यांचे विचार कामाची पद्धत व इतर अनेक बाबींमध्ये भिन्नता असते. तुमच्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार नाही.

फस्साईट हा मस्कोवाईट परीवारातील हिरव्या क्रोमियमने समृद्ध झालेला दगड आहे. त्यातील रुबीच्या समावेशामुळे तो उर्जित दगड झाला आहे. हा दगड पृथ्वीतत्त्व व वायुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. रुबी प्रेम व अग्नीचे प्रतिक आहे. ह्या सर्वांची उर्जा एकत्रित होऊन मन व शरीराला पुनरुज्जीवित करतात. रुबी मनातील आकांक्षांना चालना देऊन ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. तसेच जीवनात कोठेही केव्हाही यश प्राप्तीसाठी मनात धैर्य निर्माण करतो. फस्साईट मसाजसाठी वापरल्यास मनातील व शरीरातील ताण-तणावाची जागा आत्म- संतुलन व प्रसन्नता येईल. तुम्ही मोठ्या संकटातून, भावनिक क्लेशातून किंवा जीवनातील अत्यंत वाईट, कठीण पर्वातून बाहेर पडला असाल तेव्हा रुबी इन फस्साईट तुम्हाला कटु आठवणी विसरून जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देण्यास मदत करील. तुमच्या आयुष्यात मोठे बदल होताना नवीन परिस्थितीशी जुळवून घेताना उपयोगी ठरेल.

10) स्मोकी कॉर्टज

रंग- धुरकट चॉकलेटी किंवा करडा, राखाडी

शारीरिक उपचार- प्रदीर्घ आजारातून उठल्यावर किंवा नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडल्यावर शारीरिक उर्जेचे पुन:संचयन करताना कॉर्टजची मदत होते. शरीरातील बंद उर्जा स्त्रोत पायातील ताठरता, अ‍ॅडिशनल ग्रंथी, किडनी, पित्ताशय विशेषता मुतखडा वा शरीरातील जुने दुखणे यावर उपयुक्त.

भावनिक उपचार- नैराश्य, निद्रानाश, आत्मघात, दुःखाचा उद्रेक, सायकॉलॉजिकल समस्यांवर प्रभावी.

कामाच्या ठिकाणी – कोणतीही नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता कॉर्टजमध्ये आहे. ती शक्ती आंतरीक असो की बाह्य कॉर्टज ह्यासाठी सक्षम आहे. फक्त खडा आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घ्यावा.

व्यवहारीक उपयोग- घर, गाडी, दागिने, किमती वस्तू यांची चोरी, नुकसान किंवा अपघातापासून वाचवण्यासाठी घरात, तिजोरीत किंवा गाडीत ठेवा.

स्मोकी कॉर्टज आपल्या बॅडलकच्या विरोधात उभा राहणारा आपला रक्षक आहे. स्वित्झर्लंड, जर्मनी देशांमध्ये घरात वाईट शक्ती प्रवेश करू नये म्हणून भिंतीवर स्मोकी कॉर्टज लावण्याची प्रथा आहे. स्मोकी कॉर्टजला ड्रायविंग क्रिस्टल असेही म्हणतात, कारण हा खडा फक्त गाडीला रस्त्यांवरील अपघातांपासूनच नाहीतर गाडीतील मेकॅनिकल ब्रेकडाऊन किंवा टेक्निकल नादुरुस्तीपासूनही सुरक्षित ठेवतो. एवढेच नाही तर स्मोकी कॉर्टज गाडीत असल्यामुळे लांबच्या प्रवासातील थकवा किंवा ट्रॅफिकजाममुळे येणारा ताण दूर करतो व चालकाला तरतरीपणा देतो.

11) रोज

सिलिकॉन डायऑक्साईट, मॅगनिजसह, कधी सुईसारखे टोकदार किंवा बदामाच्या आकारात (हार्टशेप) आढळतात.

रंग- गुलाबी (बेबी पिंक) अर्धपारदर्शक, चमकदार, कधी भुरकट गुलाबी, कधी गुलाबी.

शारीरिक उपचार- मुख्यत: मातांना किचकट बाळंतपणासारखा उपयुक्त, त्वचा, डोकेदुखी, फर्टीलिटी, जेनीटल्स, स्त्रीरोग यांवर प्रभावी खडा. रात्रीची वाईट स्वप्ने, रात्रीची भीती घालवण्यासाठी.

भावनिक उपचार- नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी मनातील क्षमाशीलता वाढवण्यासाठी व प्रत्येक वाईट प्रवृत्तीवर वरचढ होण्यासाठी.

व्यवहारीक उपयोग- लहानांपासून थोरांपर्यंत निद्रनाशावरील प्रभावी खडा. रात्रीची वाईट स्वप्ने, रात्रीची भिती घालवण्यासाठी.

कामाच्या ठिकाणी- तुमच्या कामाच्या जागी पॉलिश न केलेला एक मोठा खडा ठेवल्यास तुमच्या विरोधात चालणारे कट, निंदा (गॉसिपिंग) यापासून सुटका मिळेल. रोज ला मातृत्व क्रिस्टल असेही म्हणतात. कारण आई-बाळाचे नाते दृढ करण्यात मदत करतो. विशेषतः तुमची आई गेल्यास तिचा ओलावा, तुमच्या मनात जागृत राहील. गरोदर स्त्रियांनी रोज क्रिस्टल रोज थोडा वेळ पोटावर ठेवल्यास आहे व बाळाचे बंध घट्ट होण्यास मदत होईल. गरोदर स्त्रियांनी हॉस्पिटलमध्ये जाताना रोज कॉर्टज् बरोबर नेऊन बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जवळ ठेवावे त्यामुळे आई व बाळ दोघांना सुरक्षित वाटेल.

प्रेमाचे नाते घट्ट करण्यासाठी एकमेकांना जोडलेल्या बदामाच्या आकारातील रोज कॉर्टज् (हार्ट शेप व्टीन रोज कॉर्टज्) व गुलाबी रंगातील मेणबत्त्या जोडीदाराला भेट द्या. लहानपणापासून असणारे भयगंड, उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी, तसेच प्रेमभंगाच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी वापरावा.

12) अमेथीस्ट,प्रकार- जांभळ्या रंगातील कॉर्टज्

रंग- जांभळा, लवेंडर ते गडद जांभळा

शारीरिक उपचार- मानव, वनस्पती व प्राणी या सर्वांसाठी गुणकारी. अर्धशिशी व डोकेदुखी अमेथीस्ट वाहत्या पाण्यात ओला करून कपाळावर अँटी क्लॉकवाईज् फिरवल्यास गुण येईल.

भावनिक उपचार- पुरातन ग्रीक भाषेत अमेथीस्ट म्हणजे विषापासून किंवा वाईटापासून अबाधित ठेवणारा, मुलांमधील चंचलता कमी करण्यास मदत होते. व्यसनाधीनता, पल्सीव डीसऑर्डर यावर प्रभावी.

कामाच्या ठिकाणी- अमेथीस्टचा खडा स्वच्छ धुवून पाण्यात काही तास ठेवा. नंतर हे अमेथीस्टचे सिद्ध पाणी पिण्यासाठी किंवा इतर पेयात मिसळून प्या. त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन शांत वाटेल. अमेथीस्टच्या बाबतीत असे म्हटले जाते कि अमेथीस्ट खडा तुम्ही समोर धरून तुमच्या आवडत्या व्यक्तीचे नाव आंतरीक प्रेमाने घ्या. ती व्यक्ती अगदी दुसर्‍याशी वचनबद्द असली तरीही तुमची हाक ऐकेल.

निद्रानाश वा रात्रीची वाईट स्वप्नांपासून बचाव करण्यासाठी अमेथीस्ट बेडरूममध्ये ठेवा. मुलांना वाटणारी अंधाराची भीती किंवा लहान-मोठ्यांना होणारा होम सिकनेस दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. रेकी ट्रीटमेंटचा प्रभाव वाढवण्यासाठी अमेथीस्टचा वापर करतात.

मेडीटेशन किंवा विजूअलायजेशन करताना दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवल्यास लवकर मन एकाग्र होईल. इतर खड्यांना रिचार्ज करण्यासाठी अमेथीस्ट त्यांच्या जवळ ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी हा खडा उपयुक्त आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या