बारीक-लहान बोटं असतील तर..

बारीक-लहान बोटं असतील तर..

वास्तूशास्त्र आणि हस्तशास्त्र या दोन्ही विद्यांमध्ये हातांवर असणार्‍या रेषांना बरंच महत्त्वं आहे. या रेषा पाहून जसं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, तसंच हाताची बोटं पाहूनही त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येऊ शकतो.

मुलींच्या हातांची बोटं त्यांचे स्वभावगुण काही क्षणांत सर्वांसमोर उघड करतात. बोटांचा आकार, महिलांचे स्वभाव आणि त्यांच्या स्वभावातील काही विशेष गुण सहजपणे सर्वांसमोर आणतात.

लांब आणि बारीक बोटं- जर एखाद्या महिलेच्या/ मुलीच्या हाताची बोटं बारीक आणि लांब आहेत तर तिच्यामध्ये कलागुण खचून भरले आहेत. अशा महिलांचा स्वभाव शांत असून, नातेसंबंध टिकवण्यासाठीच त्या ओळखल्या जातात.

जाड आणि लहान बोटं- जर एखाद्या महिलेच्या हाताची बोटं जाड आणि उंचीनं कमी अर्थात लहान असतील तर ती महिला स्वत:च्याच धुंदीत असणार्‍यांपैकी आहे म्हणून समजा. अशा महिलांच्या मनात कोणताही कपटी भाव नसतो. पण, जेव्हा एखाद्या कामाची जबाबदारी घ्यायची असते तेव्हा मात्र या महिला पिछाडीवर असतात.

जाड बोटं असल्यास- ज्या महिलांच्या हातांची बोटं जाड आहेत त्या महिला प्रचंड खर्च करतात. कामाप्रती असणार्‍या गांभीर्यासाठी त्या ओळखल्या जातात.

बारीक आणि लहान बोटं- अशा महिला प्रचंड काटकसर करणार्‍यांपैकी असतात. राग त्यांच्या नाकाच्या शेंड्यावरच असतो. वायफळ खर्च न करता या महिला इतर कोणालाही त्या खर्च करू देत नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com