घरात असतील या पेटींग्ज तर होईल भरभराट...

घरात असतील या पेटींग्ज तर होईल भरभराट...

घरात सुख, शांती आणि भरभराट हवी असेल तर याचे उत्तर वास्तुशास्त्रात दडले आहे. घर सजवण्यासाठी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पेटींग्ज लावले जातात. वास्तुशास्त्रानुसार या पेटींग्जची निवड केल्यास निश्चितच फायदा होईल. विशिष्ट प्रकारचे पेटींग्ज घरात लावल्यास घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. यामुळे घरात कशाच कमी निर्माण होत नाही.

वास्तू दोषामुळे देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. वास्तु शास्त्राच्या नियमानुसार घरात काही बदल केल्यास अथवा याचे पालन केल्यास निश्चित परिणाम पहायला मिळतो.

* घरात अश्वाचे चित्र लावले तर फायदेशीर असले पण ऑफिसमध्ये अशा प्रकारचे चित्र लावू नये. यामुळे व्यवसायाच्या प्रगतीत अडथळा येवू शकतो.

* नाचर्‍या मोराचे पेंटिंग (dancing peacock) हे प्रसन्नतेचे प्रतिक मानले जाते. यामुळे घरात नाचर्‍या मोराचे पेंटिग नक्की लावावे.

* धनलाभ व्हावा सासाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यामुळेच घरात लक्ष्मीचे पेंटिंग लावल्यास कायम धनलाभ होतो.

* अश्व चित्र... अर्थात सात घोड्यांचा समूह. वास्तुशास्त्रात या पेंटिगला खूपच महत्व आहे. अश्व चित्र हे शक्ती आणि विजयाचे प्रतिक मानले जाते.

* भगवान गौतम बुद्ध (Lord Gautama Buddha) हे शांतीचे प्रतिम मानले जातात. यामुळे गौतम बुद्ध यांचे पेंटिग घरात असल्यास घरात कायम सकारात्मक वातावरण राहते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com