डोळा फडफडल्यास

डोळा फडफडल्यास

तुमचा डोळा कोणत्या ना कोणत्या कारणाने कधी ना कधी फडफडला असेलच. आज आपण जाणून घेऊया की डोळा फडफडल्यास, तो उजवा असो वा डावा, त्याचे कोणते अर्थ निघतात.

सामुद्रिकशास्त्रामध्ये ह्या विषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे.भविष्यात ज्या काही घटना घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील ह्याचे पूर्वसंकेत हे आपले विशिष्ट प्रकारचे आपले डोळे फडफडणे ही क्रिया देत असते. आपण बर्‍याच लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की हा हा अवयव फडफडत होता, मग हे असे फडफडणे शुभ आहे की अशुभ ?

शास्त्रानुसार डोळ्यांचे असे फडफडणे हे आपल्याला भविष्यात होणार्‍या घटनांची पूर्वसूचना देत असत. शरीराची जवळपास सर्व अंगे फडफडत असतात आणि त्याचा काहीतरी विशिष्ट असा अर्थ असतो. काही गोष्टी ह्या शुभ होणार आहेत ह्याकडे संकेत करतात तर काही गोष्टी अशुभ होणार आहेत ह्याचे सुद्धा संकेत देतात. चला तर मग जाणून घेऊया ह्या गोष्टी.

पुरुषांमध्ये आपला उजवा डोळा जर फडफडत असेल, किंवा आपल्या उजव्या डोळ्याची भुवई फडफडत असेल तर तर ते अत्यंत शुभ मानले जाते. आणि अशा व्यक्तीला भविष्यात मोठा आर्थिक फायदा होणार असतो. त्यांची अडलेली कामे होऊ शकतात, किंवा मोठा धनलाभ होण्याची शक्यता असते.

हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल की उजवा डोळा अथवा भुवयी फडफडत असेल तर त्यांच्यासाठी हे अशुभ मानले गेले आहे आणि भविष्यात आपल्याला त्या बाबतीत अशुभ फळ मिळणार असते. त्यामुळे सावधानगी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

याउलट पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तर ते अशुभ संकेत देते, नजीकच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.कोणत्याही व्यक्तीसोबत वाद घालू नये कारण शत्रुत्व वाढण्याचे संकेत फडफडणारा डावा डोळा देत असतो. तसेच महिलांना मात्र डावा डोळा फडफडणे शुभ मानले गेले आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व कामात बरकत मिळू शकते.

Related Stories

No stories found.