Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधभारताला क्रीडाप्रेमी देश कसा बनवायचा?

भारताला क्रीडाप्रेमी देश कसा बनवायचा?

अभिनव बिंद्रा – तरुणांच्या समग्र विकासासाठी, त्यांचे शारीरिक, सामाजिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढविण्यासाठी, तसेच त्यांच्यात संघभावना आणि खिलाडूवृत्तीची भावना निर्माण होण्यासाठी खेळ-क्रीडा अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्या देशातील युवकांना खेळाकडे वळविण्यासाठी आणि आपल्या समाजाला खेळांमध्ये अधिक रस निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची चळवळ निर्माण करू शकतो?

सद्गुरु – नमस्कार, अभिनव. खेळाबद्दलची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुमचा त्यात संपूर्ण सहभाग असल्याशिवाय तुम्ही खेळूच शकत नाही. जीवनाचे सार आपल्या संपूर्ण सहभागात आहे. खेळण्यासाठी संपूर्ण सहभाग आवश्यक असतो. तुम्ही मनापासून सहभागी न होता शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊ शकता, मनापासून सहभागी न होता तुम्ही तुमच्या ऑफिसला जाऊ शकता, मनापासून सहभागी न होता तुम्ही विवाह देखील करू शकता, परंतु मनापासून सहभागी झाल्याशिवाय तुम्ही खेळ खेळूच शकत नाही. तसे केल्याने तुम्हाला हवं ते साध्य करता येणार नाही.

- Advertisement -

जेंव्हा तुम्ही चेंडू लाथाडता, किंवा टोलवता, किंवा बंदुकीची गोळी चालवता, त्यात तुमचा संपूर्ण सहभाग असल्याशिवाय ते तुम्हाला पाहिजे त्याठिकाणी जाणार नाहीत. समाजात आपल्या इच्छेनुसार ज्या गोष्टी घडत नाहीत त्याचे खापर इतर कोणावर तरी फोडून आपण ते सावरून घेऊ शकतो. परंतु खेळामध्ये मात्र आपण जे काही करतो, ते उघडपणे सर्वांना दिसून येते की त्याला केवळ आपणच जबाबदार असतो.

हा खेळाचा सर्वात चांगला पैलू आहे. हे आपल्या आयुष्यात सुद्धा करता येईल का? नक्कीच! खेळ-क्रीडा यांना देशाचे एक अविभाज्य अंग कसे बनवायचे? भारत एक क्रीडाप्रेमी देश बनण्यासाठी ग्रामीण भागात राहणार्‍या 65% जनतेला यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी एक ग्रामोत्सव आयोजित करतो, ज्यामध्ये ग्रामीण भागातील हजारो गावं खेळांमध्ये सहभागी होतात. व्यावसायिक खेळ जीवन संपलेले आहे अशा आपल्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी हा उपक्रम संपूर्ण देशात नेण्यासाठी आणि ग्रामीण भारतापर्यंत खेळ पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या